कळवण : इनरव्हील क्लब कळवण यांच्या वतीने लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात प्रथमच ‘मिसेस कळवण’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्मिता खैरनार मिसेस कळवणच्या पहिल्या मानकरी ठरल्या. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुटुंबावर ओढवलेल्या प्रसंगातून कौटुंबिक जबाबदारी सांभाळून न डगमगता स्वत:ला सावरणाºया, घर सांभाळून मुलांना व कुटुंबाला पुढे नेणाºया शहरातील महिलांना स्वयंसिद्धासुबला पुरस्काराने गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य भारती पवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष सुनीता पगार, प्राचार्य उषा शिंदे, डॉ. रुपाली गांगुर्डे, प्रतिभा चावडे उपस्थित होत्या. मिसेस कळवण स्पर्धेचे परीक्षण पूनम अहिरराव, रुपाली जाधव यांनी केले. मिसेस कळवण म्हणून स्मिता खैरनार यांची निवड करण्यात आली. द्वितीय क्रमांक तेजश्री शेंडे, तर तृतीय क्रमांक प्रिया जाधव विजेत्या ठरल्या, तर कल्पना पगार, माधुरी मालपुरे, शशिकला कोठावदे, सुमन कजगावकर, सरला महाले, सीताबाई ततार, इंदूबाई जाधव, वर्षा पगार, सुरेखा मालपुरे, लता कोठावदे यांना स्वयंसिद्धासुबला या पुरस्काराने गौरवण्यात आले. उषा शिंदे व भारती पवार यांनी मार्गदर्शन केले. मीनाक्षी मालपुरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
इनरव्हील क्लब कळवणच्यास्मिता खैरनार ठरल्या ‘मिसेस कळवण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:11 AM
कळवण : इनरव्हील क्लब कळवण यांच्या वतीने लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात प्रथमच ‘मिसेस कळवण’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देमहिलांना स्वयंसिद्धासुबला पुरस्काराने गौरविण्यात आलेजागतिक महिला दिनाचे औचित्य