शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

महावितरणने सुचविलेल्या  वीजदरवाढ प्रस्तावास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:06 AM

महावितरणने सुचविलेल्या वीजदरवाढीबाबत सोमवारी (दि. १३) होणाऱ्या सुनावणीत वीजदरवाढीला विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट वीजग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यावेळी उपस्थित होते. आयोगाची सुनावणी म्हणजे केवळ औपचारिकता न राहता त्यात ग्राहकांच्या हिताचा विचार करणे अपेक्षित असल्याचे प्रताप होगाडे यावेळी म्हणाले.

सातपूर : महावितरणने सुचविलेल्या वीजदरवाढीबाबत सोमवारी (दि. १३) होणाऱ्या सुनावणीत वीजदरवाढीला विरोध करण्याचा निर्णय महाराष्ट वीजग्राहक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यावेळी उपस्थित होते. आयोगाची सुनावणी म्हणजे केवळ औपचारिकता न राहता त्यात ग्राहकांच्या हिताचा विचार करणे अपेक्षित असल्याचे प्रताप होगाडे यावेळी म्हणाले.राज्य वीज नियामक आयोगास सादर करण्यात आलेल्या दरवाढीची सुनावणी सोमवार दि.१३ रोजी नाशिकला घेण्यात येणार आहे. या पाशर््वभूमीवर रविवारी निमात बैठक घेण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे खास उपस्थित होते. होगाडे यांनी सांगितले की, विजेचे दर हे अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असून, राज्यातील उद्योगांना अन्य राज्यांतील उद्योगांबरोबरच राज्यांतर्गत स्पर्धेस तोंड द्यावे लागत आहे. फिडर इनपूट प्रणाली, कॅप्टीव्ह प्रणाली, ओपन अ‍ॅक्सेसप्रणाली यांचा अवलंब केल्यास राज्यातील उद्योगांना माफक वीज उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.  प्रास्ताविकात निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर यांनी वीजदरवाढीमुळे होणाºया परिणामांची माहिती दिली, तर निमाचे माजी अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी निमाकडून शासन दरबारी करण्यात येणाºया पाठपुराव्याची माहिती दिली. जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे, वीजग्राहक समिती सचिव सिद्धार्थ सोनी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष नितीन वागस्कर, शशिकांत जाधव, कैलास अहेर, संजीव नारंग, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन आदींनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी संदीप भदाणे, मनीष रावळ, उदय रकिबे, हिमांशू कनानी, बाळासाहेब गुंजाळ, एन. डी. ठाकरे, नीलिमा पाटील, राजेंद्र जाधव, रावसाहेब रकिबे, राजेश गडाख, बी.जी. पालवे, दिनेश दवे, योगेश साठे, गिरीश मोहिते, प्रशांत देवळे, प्रीतेश कासार, राजन मुठाणे, एन. के. गांगुर्डे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.सुनावणीवर बहिष्कार, वीजबिलाची होळी करणारराज्य वीज नियामक आयोगाच्या सुनावणीदरम्यान तीव्र विरोध करून दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून लावावा, सुनावणीवर बहिष्कार टाकावा, महावितरणचे मुख्य अभियंता आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करावी, विविध औद्योगिक संघटनांच्या माध्यमातून निवेदन द्यावे, रस्त्यावर उतरून आंदोलन करणे अशा विविध पर्यायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर सुनावणीप्रसंगी तीव्र विरोध करावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. वीजदरवाढीचा प्रस्ताव स्वीकारल्यास कोणते आंदोलन करता येईल, याचा निर्णय निमाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीज