नाशिक : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने अंदाजे वीज देयके पाठवून लॉक डाऊन मध्ये एक प्रकारे आर्थिक शॉक दिला आहे.तर जास्तीचे बिल आल्याने संतप्त ग्राहकांनी देखील वीज वितरण कंपनीला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी सकाळी दिंडोरी रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला.वीज देयके भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी कार्यालयात वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांभोवती गराडा घालून गोंधळ घातल्यानंतर वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी देखील आडमुठे धोरण पत्करत काही काळ कामकाज बंद करत थेट पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गेल्या एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना घरपोच वीज देयके कंपनीकडून देण्यात आलेले नाही ग्राहकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अंदाजे बिलाची रक्कम कळविण्यात आली होती त्यानुसार शेकडो ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा देखील केला आहे ज्या ग्राहकांना तीनशे ते चारशे रुपये बिल यायचे त्यांना दुप्पट बिल पाठविण्यात आलेली होती तरीदेखील अनेक ग्राहकांनी वीज वितरण कंपनीला बिल रक्कम अदा केली आहे. याशिवाय शासनाने देखील ग्राहकांना वीज बिल भरणा करण्यासाठी मुदत दिली होती तर वीज वितरण कंपनीने सर्व ग्राहकांना आगामी बिलात मागील महिन्यात भरलेल्या बिलाची रक्कम वळती करण्यात येऊन बिल अदा केले जाईल असे स्पष्ट केले होते मात्र त्यानंतर देखील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज देयके पाठवून वीज वितरण कंपनीने लॉक डाऊन मध्ये ग्राहकांना आर्थिक शॉक दिल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे मंगळवारी सकाळी वितरण कार्यालयात जास्तीचे विधेयके आल्याने एका महिलेने संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली त्यावेळी शाब्दिक वाद निर्माण झाला शेकडो नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोंधळ घातल्याने काहीसे वादाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका महिलेने आम्हाला शिवीगाळ केल्याचा आरोप करत काही वेळ काम बंद केल्याचे देखील समजते सदर प्रकारानंतर संतप्त ग्राहक आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
महावितरणचा अंदाजे विजबिलांतून ग्राहकांना शॉक ; संतप्त ग्राहकांचा कार्यालयात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 1:49 PM
गेल्या तीन महिन्यांपासून ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने अंदाजे वीज देयके पाठवून लॉक डाऊन मध्ये एक प्रकारे आर्थिक शॉक दिला आहे.तर जास्तीचे बिल आल्याने संतप्त ग्राहकांनी देखील वीज वितरण कंपनीला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी सकाळी दिंडोरी रोडवरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यां भोवती गराडा घालून गोंधळ घातल्यानंतर वीज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी देखील आडमुठे धोरण पत्करत काही काळ कामकाज बंद करून थेट पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
ठळक मुद्देवीज ग्राहकांना महावितरणकडून अंदाजे बील वाढीव बिलांमुळे संतप्त ग्राहकांचा कार्यालयात गोंधळ महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पोलिसांत धाव