गेल्या काही दिवसांपासून पंचवटीतील सरदार चौक ते रामकुंड दरम्यान स्मार्ट सिटी अंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. अहिल्याबाई होळकर व्यायाम शाळेसमोर पाईप टाकण्यासाठी खड्डा करण्यात आला आहे. या खड्ड्यात जिवंत जलस्त्रोतातून आलेले पाणी साचते ते काढण्यासाठी ठेकेदाराने वीज वितरण कंपनीची परवानगी न घेता थेट विद्युत रोहित्रातून अनधिकृत वीज जोडणी करून वीज मोटरच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे काम करत होता.
गोदाप्रेमी सेवा समिती अध्यक्ष देवांग जानी यांनी वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिल्यानंतर
महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ए. एन. जोंधळे, सहाय्यक अभियंता पदमाकर हाटकर
यासह अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वीस मीटर वायर जप्त करून पंचनामा केला होता. आता या ठेकेदाराला ३१ हजार १०७ रूपयांचा दंड करण्यात आला आहे.