शेतीकामात अडथळा : शेतकरी संघटनेचे निवेदन
गोंदे दुमाला : इगतपुरी तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये हाय टेन्शन टाॅवर व उच्च अश्वशक्तीचे पोल बऱ्याच वर्षांपासून उभे करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मशागतीला अडचणी येत आहेत. त्यामुळे शेत जमिनीचे मूल्यांकन कमी झाले असून, याचा मोबदला अथवा भाडे दिले जात नाही. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात अशी परिस्थिती आहे अशा शेतकऱ्यांना भाडे अथवा मोबदला देण्यात यावा, या मागणीचे निवेदन शरद जोशी प्रणीत इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना देण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये हाय टेन्शन टाॅवर व पोलमुळे शेत पिके घेण्यास अडथळा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळाने ज्या शेतकऱ्यांच्या जमीनमध्ये हाय टेन्शन टाॅवर उभे केलेले आहेत, त्या शेतकऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे भाडेपट्टा द्यावा व त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला देऊन त्यांच्या मुलांना त्वरित महाराष्ट्र राज्य वीज महामंडळात समाविष्ट करुन घ्यावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन पाॅवर हाउससाठी अधिग्रहण करण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांच्या पाल्यास त्वरित प्रकल्पग्रस्त दाखला देऊन त्यांना वीज महामंडळात कामावर रुजू करून घेण्यात यावे, असे न झाल्यास शेतकरी संघटनेच्यावतीने इगतपुरी तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष किसन शिंदे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पाटील झाडे, तालुका संपर्कप्रमुख रामदास गायकर, आदिवासी सेलचे अध्यक्ष पांडुरंग शेंडे, अरुण जुंद्रे, रामनाथ जाधव, भाऊसाहेब गायकर, सोपान टोचे व शेतकरी उपस्थित होते.
--------------------
फोटो- ०१ इगतपुरी शेतकरी
इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष किसन शिंदे समवेत उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पाटील झाडे, तालुका उपाध्यक्ष अरुण जुंद्रे व इतर.
010921\110601nsk_57_01092021_13.jpg
फोटो- ०१ इगतपुरी शेतकरी इगतपुरी तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देतांना तालुकाध्यक्ष किसन शिंदे समवेत उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाळासाहेब धुमाळ, जिल्हाउपाध्यक्ष तानाजी पाटील झाडे, तालुका उपाध्यक्ष अरुण जुंद्रे व इतर.