भगूर : येथील नगरपालिकेच्या जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत महावितरणचे भगूर कक्ष कार्यालय सुरू असून, येथील कर्मचारी जीव मुठीत धरून कामकाज करीत आहेत. इमारतीची एकूणच परिस्थिती लक्षात घेता या कक्षाचा भाग केव्हाही कोसळू शकतो, अशी परिस्थिती आहे. मात्र वारंवार मागणी करूनही महावितरणच्या कक्ष कार्यालयास सुरक्षित जागा मिळू शकलेली नाही. भगूर पालिकेच्या रुग्णालयाची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीची दुरवस्था झाल्याने येथील रुग्णालय सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, मात्र या ठिकाणी महावितरणचे भगूर कक्ष कार्यालय सुरू आहे. सदर इमारतीचा मागील भाग ढासळला आहे, तर भिंतींना तडे गेले आहेत. भिंतीवर झुडपे उगवली असून, काही भिंतींना ओल आलेली आहे. अशा परिस्थितीतही या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी काम करीत आहेत. १९४४ साली परिसरातील दानशूर श. र. झंवर यांनी भगूर पालिकेसाठी दवाखाना बांधून दिला होता. या इमारतीमध्ये बरेच वर्षे नगरपालिकेचा दवाखाना सुरू होता. मात्र वेळचेवेळी देखभाल दुरुस्ती न झाल्याने सदर इमारत मोडकळीस आली असून, इमारतीची दुर्दशा सुरू असतानाच येथील दवाखाना बाजूलाच सुरू असलेल्या महिला प्रसूतिगृहाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला. आता मात्र या ठिकाणी महावितरणचे कार्यालय सुरू आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी येथील कार्याेलय सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात यावे, नगरपालिकेनेदेखील जुना इमारत पाडून टाकून संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी भूगर परिसरातील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून होत आहे.भिंतींना गेले तडेभगूर येथील धोकादायक जुन्या दवाखान्यातील दोन खोल्या आतल्या बाजूने बºयापैकी दिसत असल्यातर भिंतींना तडे गेले आहेत. इमारतीचे दगडी बांधकाम असल्याने सीमेंट, माती पडल्याने दगड उघड्यावर आले आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे. ४इमारतीचा पाठीमागील भाग तर काही प्रमाणात कोसळलादेखील आहे अशाही परिस्थितीत विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता कार्यालय या ठिकाणी सुरू आहे.
महावितरणचे कार्यालय धोकादायक इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:43 PM