निफाड : येथील कादवा पुलावरून स्कॉर्पिओ गाडी खाली पडल्याने निफाडचे तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली. निफाडच्या दोघा तरुणांनी कादवा नदीला महापूर आलेला असताना जिवाची बाजी लावून रात्रीच्या अंधारात या स्कॉर्पिओतील तीन तरुणांना वाचविले.निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश हरिभाऊ जंगम, कैलास अशोक कर्डिले, संतोष दादा शेळके हे तिघे जण शनिवारी रात्री १० च्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतून निफाडकडे येत होते.त्यांची स्कॉर्पिओ निफाडच्या जुन्या कादवा पुलावरून जात असताना त्यांच्यापुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या पुलावर तुटलेल्या कठड्याला आधार म्हणून लावलेल्या बॅरिकेड्सला धडक दिल्याने हे बॅरिकेड्स मागून येणाºया या स्कॉर्पिओवर आदळल्याने स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटले.स्कॉर्पिओ कादवा नदीच्या पूर आलेल्या पाण्यात पडली. पाणी स्कॉर्पिओत शिरू लागले. ही घटना घडताच कैलास कर्डिले यांनी काच फोडली व गाडीबाहेर आले. पुलाच्या पिलरच्या आधाराने ते उभे राहिले. त्यांनी मोबाइलवर आपल्या घरी, मित्रांना फोन केले.त्यानंतर जंगम आणि शेळके हे दरवाजा मोठ्या ताकदीने लोटून गाडीबाहेर आले व या स्कॉर्पिओवर बसले. गाडीच्यामागे निफाडची वाहने होती. मागील चारच दिवसांपूर्वी दि. ३१ जुलै रोजी निफाडच्या याच पुलावरून खताचा ट्रक नदीपात्रात पडून चालकाचामृत्यू झाला होता. ट्रकच्या धडकेमुळे या पुलाचे लोखंडी कठडे तुटले होते. या तुटलेल्या कठड्याच्या शेजारी बॅरिकेड्स लावून तात्पुरती सुरक्षा देण्यात आली होती. रात्रीच्या अंधारात बॅरिकेड्सला अज्ञात वाहनांची धडक बसून त्यामुळे स्कॉर्पिओचा अपघात होऊन गाडी नदीपात्रात पडण्याची घटना घडली आहे. सदर पुलाचे तुटलेले कठडे युद्धपातळीवर बसवावे अन्यथा पुढील अपघात घडून मोठी दुर्घटना घडू शकते.
कादवा पुलावरून स्कॉर्पिओ नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:53 PM
निफाड : येथील कादवा पुलावरून स्कॉर्पिओ गाडी खाली पडल्याने निफाडचे तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली. निफाडच्या दोघा तरुणांनी कादवा नदीला महापूर आलेला असताना जिवाची बाजी लावून रात्रीच्या अंधारात या स्कॉर्पिओतील तीन तरुणांना वाचविले.
ठळक मुद्देनिफाड : नागरिकांनी तिघांना सुखरूप काढले बाहेर