नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीतील १६ पैकी आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झालेले, त्यातच उरलेल्या सदस्यांपैकी पाच सदस्यांनी राजीनामा दिलेला अशा स्थितीत अवघ्या तीन सदस्यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दि. ७ मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी समितीच्या रिक्त जागांवर नियुक्तीसाठीदेखील याचवेळी म्हणजे सकाळी ११ वाजता महासभा बोलाविली असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. नाशिक महापलिकेच्या इतिहासात प्रथमच इतक्या विलंबाने अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यातच समितीत शिवसेनेचे दोन आणि एक अपक्ष असे अवघे तीन सदस्य आहेत. कायदेशीरदृष्ट्या समितीच परिपूर्ण गठीत नसताना आणि सभा घेण्याइतपत गणपूर्ती इतके संख्याबळ नसताना सादर होणाºया या अंदाजपत्रकावर भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकाºयांनी आक्षेप घेतला आहे, तर महापौरांनी कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळीच महासभा होणार असल्याने गोंधळात गोंधळ अशी भर पडली आहे. यानिमित्ताने भाजपाने प्रथमच आयुक्तांना जाहीररीत्या थेट विरोध केला आहे. दरवर्षी महापालिकेचे अंदाजपत्रक जानेवारी महिन्यातच सादर केला जातो. फार विलंब झाला तर फेब्रुवारीच्या मध्यापर्यंतदेखील तो सादर केला गेला आहे. समितीतील आठ सदस्य हे २८ फेबु्रवारीस निवृत्त होत असल्याने या कालावधीच्या आतच आयुक्त स्थायी समितीला अंदाजपत्रक सादर करतात. परंतु असे असताना यंदा आयुक्त अभिषेक कृष्ण यांची झालेली बदली आणि नूतन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारला या घडामोडींमुळे अद्यापही प्रशासनाचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर झालेले नाही. अंदाजपत्रक सादर करण्यासाठी महासभेवर प्रशासनाने सादर केलेले वेळापत्रक केव्हाच टळून गेले आहे.
बुधवारी गोंधळ : स्थायी समितीत सदस्यच नसताना मुंढे सादर करणार अंदाजपत्रक महापालिकेत बजेटचा पेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 2:25 AM
नाशिक : स्थायी समितीतील १६ पैकी आठ सदस्य नियमानुसार निवृत्त झालेले, त्यातच उरलेल्या सदस्यांपैकी पाच सदस्यांनी राजीनामा दिलेला अशा स्थितीत अवघ्या तीन सदस्यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दि. ७ मार्च रोजी अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देमहासभा बोलाविली असल्याने मोठा पेच निर्माणगोंधळात गोंधळ अशी भर पडली आहे