शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

भगूरला मोकाट श्वान, वराहांचा वाढता उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:35 AM

शहरात मोकाट श्वान, वराह व घाण पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, गावात अनेक रोग पसरले आहेत. भगूर पालिका व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वराह पाळणारे व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.

भगूर : शहरात मोकाट श्वान, वराह व घाण पाणी यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून, गावात अनेक रोग पसरले आहेत. भगूर पालिका व मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वराह पाळणारे व पालिका मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निवेदन पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.भगूर शहरात मोठ्या प्रमाणात वराहांचा सुळसुळाट होऊन ठिकठिकाणी सांडपाण्याचे डबके साचून त्यात वराह व श्वान लोळत असतात, त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी भगूर मुख्याधिकारी यांना याबाबत अनेक निवेदन दिली, तरीही ते दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक कार्यकर्ते धीरज गायकवाड, सुभाष गायकवाड, राजेश एस. गायकवाड आदींनी वराह पालन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन नाशिक जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिले आहे. तसेच भगूर मुख्याधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.स्वाइन फ्लू, डेंग्यूची लागणभगूर मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्र ारी करून कारवाई केली जात नाही, कामात कुचराई केली जाते त्यामुळे मोकाट वराह व श्वान यांच्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढून नागरिकांना स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच अनेक रोगांची लागण झाली आहे. शिवाय वराहपालन मोठ्या प्रमाणात होत असून, गावभर मोकाट सोडली असल्याने अनेक लहान मुलांना चावा घेत आहेत. मात्र भगूर पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदनात नमूद केले आहे.पालिकेचे दुर्लक्षभगूर पोलीस चौकीसमोर व स्मशानभूमी रस्त्यालगत राहणारी काही कुटुंबे वराहपालन करीत असून, दिवसभर चरण्यासाठी शहरात वराह मोकाट सोडली जातात. कारवाई केल्यास काही दिवस घरात बांधून ठेवतात व पुन्हा सोडून देतात. यावर भगूर पालिकेच्या वतीने काहीच कारवाई न करता त्यांच्या दादागिरीला घाबरत असल्याचे अनेक नागरिकांनी संतापात सांगितले.

टॅग्स :dogकुत्राTrafficवाहतूक कोंडी