रविवारी आरोग्य, तर सोमवारी बांधकामच्या बदल्यानाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्यांना मुहूर्त सापडला असून, शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार शनिवारी (दि.१७) सामान्य प्रशासन, कृषी व अर्थ विभागातील कर्मचार्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्या. सर्वाधिक बदल्या कनिष्ठ सहायक संवर्गातील कर्मचार्यांच्या झाल्या.सामान्य प्रशासन विभागातील एकूण ३० प्रशासकीय तर १० कर्मचार्यांच्या विनंती बदल्या झाल्या. अर्थ विभागातील कर्मचार्यांच्या रात्री उशिरापर्यंत बदल्यांची कार्यवाही सुरू होते. सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गात दोन प्रशासकीय बदल्या करावयाच्या होत्या; मात्र जागा रिक्त नसल्याचे कारण देत या बदल्या टाळण्यात आल्या. कार्यालयीन अधीक्षक संवर्गातील प्रशासकीय स्वरूपाच्या दोन बदल्या करावयाच्या असताना प्रत्यक्षात तीन करण्यात आल्या तर विनंती स्वरूपाच्या तीन बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. कनिष्ठ सहायक संवर्गात २१ प्रशासकीय तर पाच विनंती स्वरूपाच्या तसेच वरिष्ठ सहायक संवर्गातून १४ प्रशासकीय तर २ विनंती स्वरूपातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. कृषी विभागातील तीन कृषी अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या, तर विस्तार अधिकार्यांच्या दोन प्रशासकीय व एक विनंती अशा तीन बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. या कृषी विस्तार अधिकार्यांना पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागी नियुक्त्या देण्यात आल्या. रविवारी (दि.१८) आरोग्य विभागाच्या तर सोमवारी (दि.१९) लघुपाटबंधारे, बांधकाम व पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या होणार आहेत. बदल्यांची कार्यवाही मुख्यालयातील रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोेराडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषी, अर्थ, सामान्य प्रशासन विभागाच्या बदल्यांना लागला मुहूर्त
By admin | Published: May 17, 2014 11:52 PM