सातपूर : येथील मुक्ती महिला मंडळ आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर कॉलनीत सूर्याथॉन २०२० उपक्रमांतर्गत सलग १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्र म साजरा करून एक पाऊल निरामय आरोग्याकडे असा संदेश देण्यात आला.सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात या आगळ्यावेगळ्या उपक्र माचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सलीम शेख, नगरसेविका सीमा निगळ, हेमलता कांडेकर, मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉ. राजश्री वाणी, चारु लता शिरसाठ, रोहिणी नायडू, पुष्पा चोपडे आदी उपस्थित होते. प्रारंभी योगाचार्य गोकुळ घुगे यांनी जीवनात योगाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. तर पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी अॅड. प्रभाकर खराटे यांनीही मार्गदर्शन करीत एक पाऊल निरामय आरोग्याकडे हा संदेश दिला. प्रास्ताविक मुक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा योगीता भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन सुवर्णा काकुस्ते यांनी केले. स्वागत शशिकला पाटील यांनी केले. पुष्पा भारद्वाज यांनी आभार मानले. योगाचार्य गोकुळ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरातील २५० महिला व पुरु षांनी सलग १०८ सूर्यनमस्कार या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी मंडळाच्या मनीषा गवळी, रेखा शर्मा, रंजिता महाडिक, अलका तरटे, सुनंदा सोनवणे, इंदुमती भामरे, अलका गायकवाड, आशा शिंदे आदींसह पदाधिकारी, सदस्य व परिसरातील महिला सहभागी झाले होते.
मुक्ती महिला मंडळातर्फे ‘सूर्याथॉन’ उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:17 PM
मुक्ती महिला मंडळ आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर कॉलनीत सूर्याथॉन २०२० उपक्रमांतर्गत सलग १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्र म साजरा करून एक पाऊल निरामय आरोग्याकडे असा संदेश देण्यात आला.
ठळक मुद्देसलग १०८ सूर्यनमस्कार : निरामय आरोग्याचा दिला संदेश