नाशिक : सकाळ पासून सायंकाळ पर्यंत नेहमीच गजबज असलेला नाशिकरोड येथील मुक्तिधामचे आवार ओस पड़ले असून येथील व्यवसायिकांचे व्यावसाय बंद झाले आहेत ते पुन्हा केव्हा सुरु होतील याचा कोणताही अंदाज व्यवसायिकाना नाही .नाशिक रोडची देशभरात वेगळी ओळख निर्माण करणारे मुक्तिधाम प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे . देशभरतील भाविकांचा येथे नेहमी राबता असतो यामुळे सकाळ पासून सायंकाल पर्यंत मुक्तिधामचे अवार चेतन्याने भारलेले असते . सकाळ पासुनच ग्राहकांची चहल पहल असलेल्या या परिसरातील दुकान सकाळ पासुनच सुरु होतात ती रात्री 9 पर्यंत सुरु असायची कोरोनामुळे मार्च महिन्यात शासनाने देशभरात लॉकडाउन जाहिर केल्यानंतर सर्व धार्मिक स्थळ बंद करण्यात आली . मुक्तिधामहि त्याला अपवाद ठरले नाही . संचारबन्दीमुळे भविकांची संख्या रोडवली मंदिराचे मुख्य प्रवेशद्वारच बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकन्हि आत मध्ये जाता येत नाही . हक्काचा ग्राहक येणे बंद झाल्यामुळे येथील व्यवसायिक अडचणीत आले आहेत . आज मुक्तिधामचे सर्व अवार सुने सुने झाले असून एकही दुकान सुरु नाही . भविकांची वर्दळ नाही . यामुळे संपूर्ण अवार ओस पड़ले आहे . धार्मिक स्थळ खुली करण्याची मागणी होत असली तरी शासनाने अद्याप त्याला परवानगी दिली नाही . ती केव्हा मिळेल याचा कोणताही अंदाज नसल्याने व्यवसायिकाना दुकाने बंद ठेवन्याशीवाय पर्याय नाही मागील सहा महिन्यापासुन दुकान बंद असल्यामुळे या व्यवसायिकाना विविध आडणीचा सामना करवा लागत आहे