नाशिक : लाखो रुपये खर्च करून मुलतानपुरा भागात बांधण्यात आलेली प्रसुती रुग्णालयाची इमारत अजूनही वापराविना पडून आहे. याठिकाणी वैद्यकीय सुविधा व मनुष्यबळ अजूनही उपलब्ध होऊ शकले नसल्याने परिसरातील महिलांना प्रसुतीसाठी दूरचे रुग्णालय गाठावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत पालकमंत्र्यांना निवेदन देेेेऊन हे प्रसुती रुग्णलाय तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
नाशिक महानगरपालिकेने शहरातील मुलतानपुरा भागात प्रसृतिगृहासाठी तीन मजली इमारत ही बांधलेली आहे. परंतु अद्याप हे प्रसुती रुग्णालय सुरू झालेले नाही. या भागात अनेक गरजू, गरीब, हातमजूर, कामगारवर्ग राहात असून, येथील महिलांना प्रसृतिगृहासाठी दूरचे शासकीय रुग्णालय अथवा खासगी आणि खर्चिक रुग्णालयात दाखल व्हावे लागते. सध्या कोरोना काळात येथील नागरिकांना दूरवर रुग्णालयांमध्ये जाणे शक्य नसल्याने मुलतानपुऱ्यातील प्रसुती रुग्णालय तत्काळ सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात अनेकदा प्रशासनास विनंती करूनही अद्याप रुग्णालय झालेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत संबंधित प्रसुती रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली आहे. यावेळी दीपाली व्यावहारे, अंकुशा राऊत, नीलेश वनवाळी, संतोष जाधव, सचिन कोहरे, सचिन कोढरे, एस. बी, कोष्टे आदी उपस्थित होते.
(आरफोटो- १४ मुलतानपुरा हॉस्पिटल)