शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नववीतील तेजसने बनवले बहुपर्यायी फवारणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 6:06 PM

सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देनववीच्या विद्यार्थ्यांने साकारली जुगाड तंत्रज्ञानाची भन्नाट कल्पनायवतमाळच्या तेजस काळेने सायकलच्या पार्टपासून बनवले फवारणी यंत्रजागतिक कृषी महोत्सवात फवारणी यंत्राने वेधले शेतकऱ्यांचे लक्ष

नाशिक : सध्या सोशल मीडियावर जुगाड तंत्रज्ञानाच्या भन्नाट कल्पना पहायला मिळतात. या कल्पना प्रत्यक्षात उतरवता आल्या तर अनेक कामे किती सहज आणि सोपी होतील, असा विचार करून अनेकजण या जुगाड तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामात करण्यास इच्छुक असतात. असे जुगाड तंत्रज्ञान शेतीसाठीही अतिशय फायदेशीर ठरू शकते, ही गोष्ट हेरून अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याने टाकाऊ पाईप आणि सायकलचे पार्ट वापरून बहुपर्यायी व बहुउपयोगी फवारणी यंत्र विकसित केले असून, नाशिकमधील जागतिक कृषी महोत्सवात तेजसचे फवारणी यंत्र शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर बुधवार (दि.25) पासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवात अमरावती जिल्ह्यातील दिग्रस येथील दीनबाई विद्यालयातील तेजस काळे याने शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतऱ्यांचे कष्ट आणि समस्या अतिशय जवळून पाहिल्या आहेत. ऐन बहरात असलेल्या पिकावर अचानक किडीचा प्रादुर्भाव होऊन ते भुईसपाट होताना आणि फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतानाही कोवळ्या वयात बघितलेल्या तेजसने शेती क्षेत्रात काम करून शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. याच प्रयत्नातून तेजसने सायकलचे जुने टाकाऊ चाक, प्लॅस्टिक कॅन, प्लॅस्टिकचे नळ, टाकाऊ पाईपचे तुकडे, नोझल व पिस्टन सारखे साहित्य वापरून बहुउपयोगी फवारणी यंत्र तयार केले आहे. हे फवारणी यंत्र हाताळण्यास अतिशय सोपे असून महिलाही ते सहज वापरू शकतात. औषधाचा साठाही यंत्रावर फिरवणे शक्य असल्याने फवारणी यंत्र खांद्यावर घेण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे खांद्यावरचे ओझे कमी होऊन त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे तेजस यंत्राची माहिती देताना सांगतो. शेतकऱ्यांच्या घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून या यंत्राची निर्मिती केली असल्याने त्यासाठी अतिशय कमी खर्च येतो. फवारणी यंत्र शरीरापासून दूर व पुढे ढकलता येणारे असल्याने त्यापासून विषबाधा होण्याची शक्यता कमी असून, देखभाल व दुरुस्तीचा खर्चही अत्यल्प असलेल्या या यंत्रमुळे कापूस, तूर, द्राक्ष, टमाटा व अन्य पालेभाज्या व फळभाज्यांना एकसारखी फवारणी करणे शक्य असल्याचा विश्वास लहानगा नवसंशोधक तेजस काळे याने व्यक्त केला आहे.शेत राखणीसाठी कटकटी यंत्रपीक कापणीला आले असताना जंगली प्राणी व पक्ष्यांपासून राखणी करण्यासाठी शेतकऱ्यांना डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस राखण करावी लागते. ही गोष्ट लक्षात घेऊन जळगावच्या बोदवड तालुक्यातील साळशिंग येथील प्रतापराव देशमुख यांनी जुना पत्र्यापासून बनवलेली फिरकी डब्याला जोडून कटकटी यंत्र तयार केले आहे. हवेच्या वेगाने फिरकी फिरून शेतात डबा वाजवल्याचा आवाज येत असल्याने शेतात उपद्रवी प्राणी-पक्षी फिरकत नसल्याने हे कटकटी यंत्र शेतकऱ्याचे पीक राखणीसाठी मदत करणारे असल्याचे देशमुख सांगतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानNashikनाशिकAgriculture Sectorशेती क्षेत्रStudentविद्यार्थी