शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मालेगाव शहरातून मूक मोर्चा, सामुदायिक अजान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 12:47 AM

मालेगावमध्य : बाबरी मशीदच्या पतनदिनानिमित्ताने बाबरी मशीद बचाव कमिटीच्या वतीने माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहिदोंकी यादगार येथे सामुदायिक अजान देण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रांत अजय मोरे यांनी स्वीकारले.

ठळक मुद्देबाबरी मशीद बचाव कमिटीचा उपक्रम : प्रांताधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर

मालेगावमध्य : बाबरी मशीदच्या पतनदिनानिमित्ताने बाबरी मशीद बचाव कमिटीच्या वतीने माजी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर शहिदोंकी यादगार येथे सामुदायिक अजान देण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रांत अजय मोरे यांनी स्वीकारले.६ डिसेंबर १९९२ साली अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन झाले होते. या घटनेस २६ वर्षे झाल्याने शहरातील बाबरी मशीद बचाव कमिटीच्या वतीने गुरुवारी मुशावरत चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ तरुणांनी काळ्याफिती बांधून, हातात काळे झेंडे घेत तर काहींनी काळे कपडे परिधान करून मोर्चात सहभाग घेतला. रॅली मोहंमद अली रस्ता, पेरी चौक, किदवाई रोड मार्गे शहिदोंकी यादगार येथे पोहोचला. यावेळी पोलिसांनी मोर्चा अडविला. येथे त्याचे सभेत रूपांतर झाले.मुफ्ती मोहंमद इस्माईल म्हणाले की, बाबरी मशीद हा धार्मिक प्रश्न आहे. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून निर्णय आम्हास मान्य राहील. आमच्या भावना कळविण्यासाठी शांततेच्या मार्गाने मूक रॅलीचे आयोजन करीत सरकारकडे निषेध नोंदवित आहोत. सरकारने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर मागण्यांचे निवेदन प्रांत अजय मोरे यांना सादर करण्यात आले.यावेळी मुस्तकीम डिग्निटी, हाजी युसूफ इलियास, नगरसेवक एजाज बेग, अतिक कमाल यांच्यासह समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. बाबरी मशीद बचाव कमिटीचे अध्यक्ष बुलंद एकबाल यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते मुंबई येथे आहेत. त्यामुळे त्यांनी भ्रमणध्वनीवरूनच सभेस मार्गदर्शन केले. बुलंद एकबाल म्हणाले की, दिवंगत नेते निहाल अहमद यांनी बाबरी मशीद बचाव समितीची स्थापना करून वेळोवेळी आंदोलने केली होती. हीच परंपरा पुढे चालवित रॅलीचे आयोजन करून सरकारचे याप्रश्नी लक्ष वेधण्यात येत आहे.