शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

अवैध धंद्यांबाबत मुंबई नाका पोलीस अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:29 AM

मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये असलेले अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखा छापा टाकून कारवाई करते, मात्र मुंबई नाका पोलिसांना या कत्तलखान्यांची माहितीच नसते वा ते पूर्णत: अनभिज्ञ असतात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे़ त्यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक नेमके करते तरी काय व त्यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़

इंदिरानगर : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगरमध्ये असलेले अवैध कत्तलखान्यांवर गुन्हे शाखा छापा टाकून कारवाई करते, मात्र मुंबई नाका पोलिसांना या कत्तलखान्यांची माहितीच नसते वा ते पूर्णत: अनभिज्ञ असतात याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे़ त्यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथक नेमके करते तरी काय व त्यांच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने वीस दिवसांपूर्वी भारतनगर परिसरातून जनावरांचे ४५० मांस जप्त करून अवैध कत्तलखानाही उद्ध्वस्त केला होता़ विशेष म्हणजे ही घटना ताजी असतानाच युनिट एकने पुन्हा भारतनगर परिसरात छापा टाकून कत्तलीसाठी उपाशीपोटी बांधून ठेवलेल्या पाच गोºह्यांची सुटका केली़  मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भारतनगर परिसरात सुरू असलेले अवैध कत्तलखाने आणि अवैध धंद्यांची गुन्हे शाखेच्या युनिट एक व दोनला माहिती मिळते व कारवाईही केली जाते, मात्र मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व गुन्हे शोध पथकाला कळत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़  मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत असलेले भारतनगर, नंदिनीनगर, शिवाजीवाडी या परिसरांत सुमारे ७ ते ८ हजार लोकांची वस्ती असून, मजुरांची संख्या अधिक आहे़ या परिसरातील गुन्हेगारांवर पोलिसांनी यापूर्वीही कारवाई केली असली तरी अवैध धंदे कमी झाले नसून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ त्यामध्ये प्रामुख्याने मटका, जुगार, गांजा, अवैध मद्यविक्री व कत्तलखान्यांचाही समावेश आहे़ या ठिकाणी सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना नेमके अभय कोणाचे? असा सवाल नागरिकांकडून केला जातो आहे़

टॅग्स :Crimeगुन्हाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय