शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

नाशकात मुंबई नाका, उपनगरमध्ये घरफोड्या- सव्वादोन लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 4:47 PM

नाशिक शहरात दिवसेंदिवस घरफो़ड़्य़ांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, शहरातील विविध भागात बंद घरांचे कुलुप तोडून घरातील सोने चांदिच्या दागिन्यांची लूट होत असताना पोलिसांकडून चोरट्यांवर कारवाई होत नसल्याने वेगवेगळ्या भागातील भुरट्या चोरांचे धाडस वाढले असून त्यांनी पोलिसांसमोर शहरातील घरफोड्या रोखण्याचे आव्हान निर्माण केले आहे.

ठळक मुद्देनाशकात घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटना चोरट्यांनी लुटला 1 लाख ३७ हजार रुपयांचा ऐवजचोरट्यांचे पोलिसांसमोर घरफोड्या रोखण्याचे आव्हान

नाशिक : शहरातील मुंबई नाका व उपनगर भागात दोन वेगवेगळ््या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करुन तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरफोडीची पहिली घटना मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपालीनगरमधील जयश्री आॅर्केड येथील राजेश रमाकांत कुलकर्णी ( ५३) याच्या घरात घडली. राजेश कुलकर्णी बाहेरगावी गेलेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून ५३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी कुलकणी यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घरफोडीची दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड भागातील जुना सायखेडा रोड येथील ओंकार हाईट्स येथे सिद्धांत अशोक जाधव (३०)यांच्या घरात घडली. सिद्धांत जाधव बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरटचाने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील दोन कपाटांतील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ८४ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरी वस्तीत सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा प्रकारे घरफोड्या व भूरट्या चोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोरRobberyचोरी