नाशिक : नाशिकहूनमुंबईला जाण्यासाठी आता तीन ते साडेतीन तास वेळ लागत असला तरी आता समृद्धीमुळे नाशिककरांना हायस्पीड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. नाशिक शहरातून इगतपुरीमार्गे नागपूर ते मुंबईसमृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी १६ किलोमीटर विशेष मार्गिका (डेडीकेटेड रोड) तयार करण्यात येणार असून, तो झाल्यानंतर नाशिककर थेट भरवीर येथून समृद्धी मार्गावर जाऊ शकतील आणि त्यामुळे मुंबई अवघ्या तासाभरात गाठता येणार आहे.नाशिकच्या रोड कनेक्टिव्हीटीला अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. दोनशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तो मंजूर होताच प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्य शासनाचा नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, ५५ हजार कोटी रुपयांच्या या कामाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यातून हा मार्ग होणार असून त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाची परिमाणे बदलतील, परंतु नाशिक शहराच्या रोड कनेक्टिव्हीटीला आणखी एक नवा आयाम मिळणार आहे. समृद्धी मार्ग होत असताना नाशिक शहराला तो जोडण्यासाठी विशेष मार्ग असावा, अशी मागणी होत होती. डिसेंबर २०१७ मध्ये नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धीला जोडणारा मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाला आदेश दिले होेते. महामंडळाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून तसा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, तो शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.नाशिक शहरातून बाहेर पडल्यानंतर वाडीवºहे गावाजवळ असलेल्या दारणा फाटा येथून हा मार्ग तयार करण्यात येणार आहे. अस्वली स्टेशन, साकूर, कवडदरा मार्गे भरवीर असा मार्ग असेल, तेथून तीन किलोमीटर नियमित महामार्गावरून गेल्यानंतर भरवीर इंटरचेंज येथून समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. या मार्गावर आल्यानंतर ठाणे (मुलुंड) म्हणजे मुंबईपर्यंत अवघ्या एकनिफाड ड्रायपोर्टही समृद्धीला जोडणारकेंद्र शासनाच्या वतीने महाराष्टÑात वर्धा, जालना आणि नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ड्रायपोर्ट घोषित करण्यात आले आहे. यातील वर्धा आणि जालना हे अगोदरच समृद्धीला विशेष मार्गाद्वारे जोडण्याचे काम झाले आहे. निफाडच्या अगोदरच्या प्रस्तावात समावेश नव्हता. आता तो जोडण्यासाठी विशेष मार्ग तयार करण्याबाबत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी चर्चा करण्यात येत आहे. ड्रायपोर्टवरून कंटेनरने माल पाठविला जातो. त्यामुळे तो नियमित मार्गावरून जाण्यापेक्षा विशेष मार्गाने समृद्धीपर्यंत नेऊन पुढे त्यावरून जेएनपीटीपर्यंत कंटनेर नेता येतील.
नाशिककर अवघ्या तासाभरात गाठणार मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:13 AM