नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांचे लॉकडाउन सुरू असताना या काळात नागरिकांना भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून, मुंबई शहराला भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी बुधवार (दि.२५) पासून मुंबईतील दादर आणि भायखळा येथील मार्केट सुरू करण्यात आले आहेत. वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुवारपासून सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.लॉकडाउनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात आल्याने मुंबई शहर व परिसरातील नागरिकांना नियमित भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होणार आहे. भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना अडवू नये, वाहतुकीत अडकलेल्या वाहनांना मार्गस्थ करण्यात यावे असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत.भुजबळ यांनी मुंबई व नाशिक पोलीस आयुक्तांशी दूूरध्वनीद्वारे संपर्क करून माल घेऊन जाणारी आणि त्यानंतर परतणारी रिकामी वाहने पोलिसांनी तत्काळ सोडावी, असे आदेश दिले आहेत. शेतकरी व भाजीपाला विक्रेते आणि अन्नधान्य व्यापाऱ्यांनी नागरिकांना जीवनावश्यक माल नियमित उपलब्ध करून द्यावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे.
मुंबईचा जीवनावश्यक पुरवठा सुरळीत होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:22 PM
नागरिकांना भाजीपाल्यासह इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून, मुंबई शहराला भाजीपाला व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी बुधवार (दि.२५) पासून मुंबईतील दादर आणि भायखळा येथील मार्केट सुरू करण्यात आले आहेत. वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती गुरुवारपासून सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
ठळक मुद्देछगन भुजबळ : भाजीपाला, मार्केट सुरू करण्यासाठी उपाययोजना