नाशिक : दाऊदचे तख्त मिळविण्यासाठी दाऊदचा शार्पशूटर असलेला बादशाह ऊर्फ सुका पाचाने ‘मास्टर प्लॅन’ आखला होता. मुंबईचा नवा ‘डॉन’ होण्यासाठी त्याने ‘तजवीज’ करून शस्त्रे मिळविण्यासाठी उत्तर प्रदेशमधील दुकानही लुटल्याची चर्चा ग्रामीण पोलिसांच्या वर्तुळात ऐकू येत आहे. मोठा शस्त्रसाठा लुटून महाराष्टÑाच्या हद्दीत पाचा आला व मुंबईपासून केवळ ३५० किलोमीटर अंतरावर असताना नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्याचा मनसुबा उधळला. बादशाह ऊर्फ सुका पाचा व त्याच्या सात साथीदारांनी बुधवारी (दि. १३) उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील पंजाब आर्म्स सेंटर नावाचे शस्त्रांचे दुकान लुटले. हजारो जिवंत काडतुसे, पिस्तूल, रायफल असा मोठा शस्त्रसाठा घेऊन उत्तर प्रदेशच्या हद्दीतून निसटण्यास पाचा व त्याचे सर्व साथीदार यशस्वी झाले होते. कुठल्याही चेक पोस्टवर पाचाच्या जीपचा कोणालाही संशय आला नाही व पाचा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या सीमा सहज ओलांडून महाराष्टÑात घुसला, मात्र मालेगावमार्गे मुंबईला जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी त्याला चांदवड जवळ ताब्यात घेतले. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकासह मुंबई, नाशिकचे गुन्हे शाखेचे पथक, गुप्तहेर संस्था सतर्क झाल्या. मुंबईमध्ये पाचाशी संपकर् ात असलेल्या संशयितांना शोधून त्यांच्या धरपकडीचे सत्र सुरू झाले असून, पोलिसांनी आमीर रफिक शेख (२५, मुंबई), वाजीद अली शहा (२७) यांनाही अटक केली आहे. नाशिकचे स्थानिक गुन्हेशाखा व दहशवादविरोधी पथकाकडून तिघांची कसून चौकशी सुरू असून, चौकशीदरम्यान मिळणाºया माहितीच्या आधारे पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न मुंबईसह उत्तर प्रदेशमध्ये केला जात आहे. सुका पाचाच्या टोळीला उत्तर प्रदेशमध्ये गुंडांनी मदत केली आहे का? त्या दिशेनेही तपास सुरू आहे.मन्या सुर्वेच्या व्यूहरचनेनुसार प्लॅन‘शुटआउट अॅट वडाळा’ या चित्रपटाच्या कथानकामध्ये दाखविलेल्या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन मन्या सुर्वेच्या व्यूहरचनेनुसार सुकाने प्लॅन केल्याचे दिसून येत आहे. दाऊदचा शार्पशूटर असलेला पाचा हा स्वत: मुंबईवर आपली दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता. गॅँगनिर्मिती करून शस्त्रांच्या माध्यमातून दहशत पसरवून त्याला ‘भाई’ म्हणून स्वत:चे अस्तित्व निर्माण करायचे होते, असे तपासातून पुढे येत आहे.तुरुंगातच शिजला असावा कटसुका पाचा हा जयपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत होता. जामिनावर जयपूर तुरुंगातून आॅगस्ट महिन्यात बाहेर आल्यानंतर त्याने शस्त्रलुटीचा कट यशस्वीतेसाठी हालचाली सुरू केल्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये शस्त्रे ही पोलीस ठाण्यांमध्ये नव्हे तर शस्त्रांच्या अधिकृत परवानाधारक दुकानामध्ये जमा करण्याची पद्धत आहे. यानुसार पाचाने उत्तर प्रदेशच्या निवडणुकानंतर बांदा जिल्ह्णातील पंजाब आर्म्स सेंटर नावाच्या दुकानाला लक्ष्य केले. लुटलेल्या शस्त्रसाठ्याचे आधारे मुंबईत त्याला आपले स्थान अधिक भक्कम करावयाचे होते, असा धागा सध्या पोलिसांच्या हाती लागला आहे. उत्तर प्रदेशमधील शस्त्राच्या लुटीचा कट पाचाने जयपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच केला असावा, अशीही चर्चा सुरू आहे. या तुरुंगात तो काही मोठ्या गुंडांच्या संपकर् ात आल्याचेही बोलले जात आहे.प्रेयसीसोबत लुटत होता पर्यटनाचा आनंदसुका पाचासोबत शस्त्रसाठा लुटीमध्ये मदत करणारा संशयित आरोपी वाजीद अली शहा हा त्याच्या प्रेयसीसोबत राजस्थानचे पर्यटन करीत होता. पर्यटनासाठी त्याने मुंबईतून राजस्थान गाठल्याचा सुगावा पोलिसांना मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांसह मुंबई गुन्हे शाखा सातत्याने राजस्थानमधील जयपूर, अजमेर, जोधपूर, जैसलमेरसारख्या मोठ्या शहरांच्या पोलिसांसोबत संपर्कात होते. संशयित वाजीदची माहिती या पोलीस ठाण्यांना देण्यात आली होती. त्यानुसार अजमेर पोलिसांनी वाजीदला बेड्या ठोकल्या.
मुंबईचा नवा ‘डॉन’ : शस्त्र लुटीनंतर दहशत पसरविण्याचा होता मनसुबा दाऊदचे तख्त घेण्याचा सुका पाचाचा होता प्लॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 1:45 AM
नाशिक : दाऊदचे तख्त मिळविण्यासाठी दाऊदचा शार्पशूटर असलेला बादशाह ऊर्फ सुका पाचाने ‘मास्टर प्लॅन’ आखला होता.
ठळक मुद्देनाशिक ग्रामीण पोलिसांनी मनसुबा उधळला गुप्तहेर संस्था सतर्क झाल्या