नाशिक : २०२ कोटी रुपयांच्या एलईडी घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर अडथळा दूर झाल्यानंतर महापालिकेच्या विद्युत खांबांवर एलईडी दिवे लावण्यात येणार असून, त्यासाठी ई-ई-एसएल या सरकारी एजन्सीकडून अथवा ई-निविदाद्वारे प्रस्ताव मागविले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर फिटिंग्जच्या माध्यमातून वीज बिलात बचत होणार असल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे. शहरात अस्तित्वात असलेले पथदीप काढून त्याठिकाणी वीज बिलाचा खर्च कमी करणारे आणि उजळणाºया एलईडी दिव्यांची फिटिंग्ज बीओटी तत्त्वावर बसविण्याचा निर्णय साडेचार वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासाठी हैदराबाद येथील एमआयसी कंपनीला २०२ कोटी रुपयांचा ठेका दिला गेला. एलईडी खरेदीप्रकरणी एमआयसी कंपनीने न्यायालयात दावा ठोकला होता. मात्र, सदर कंपनीचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला असून, कायदेशीर अडचण दूर झाली आहे. त्यामुळे सदर एलईडी बसविण्यात कोणतीही अडचण राहिली नसल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत नगरसेवक निधीतून जेथे एलईडी बसवले गेले असतील ते वगळून अन्य ठिकाणी एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत.
महापालिका आयुक्त : सरकारी एजन्सीमार्फत मागविणार प्रस्ताव शहरभर एलईडी झगमगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 1:22 AM
नाशिक : २०२ कोटी रुपयांच्या एलईडी घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर अडथळा दूर झाल्यानंतर एलईडी दिवे लावण्यात येणार असून, त्यासाठी ई-ई-एसएल या सरकारी एजन्सीकडून अथवा ई-निविदाद्वारे प्रस्ताव मागविले जाणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ठळक मुद्दे दिव्यांची फिटिंग्ज बीओटी तत्त्वावर कंपनीने न्यायालयात दावा ठोकला