सिडको : लेखानगर येथील साई प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या छतावर बिल्डरने भाडेतत्त्वावर सुरू केलेले विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर महापालिकेने कारवाई करीत सील केले.सिडकोसह परिसरात मोठ्या प्रमाणात इमारतीच्या छतांवर मोबाइलच्या विविध कंपन्यांचे टॉवर बसविण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. टॉवर उभारण्यासाठी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्याने यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिडकोतील लेखानगर परिसरात एका बिल्डरने साई प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधले आहे. याठिकाणी हॉस्पिटल, टीव्ही शॉप, मोबाइल, इलेक्ट्रिकल शॉपसह सुमारे ६८ शॉप आहे. इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरने या इमारतीच्या छतावर विविध कंपन्यांचे चार ते पाच मोबाइल टॉवर उभारले असून, याबाबत संबंधित बिल्डरने एकाही शॉप मालकाकडून परवानगी घेतलेली नाही. संबंधित बिल्डरने गेल्या दहा वर्षांत मोबाइल टॉवरच्या भाडेपोटी लाखो रुपये कमविले असून, याबाबत सर्व शॉपधारकांनी त्यांच्याविरोधात आयुक्तांकडे लेखी स्वरूपात तक्रारी केल्या असून, शॉपमालकांनी याच परिसरात असलेल्या लेखा विभागाचे अधिकारी धनंजय सिंग यांनादेखील निवेदन दिले. यानंतर सिंग यांनी याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेत कारवाई करण्याबाबत सांगितले. आयुक्तांनी मनपा अधिकाºयांमार्फत संपूर्ण माहिती घेत अनधिकृत टॉवर सिल केले.
महापालिका आयुक्तांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:25 AM
लेखानगर येथील साई प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या छतावर बिल्डरने भाडेतत्त्वावर सुरू केलेले विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर महापालिकेने कारवाई करीत सील केले.
ठळक मुद्देलेखानगर साई प्लाझा कॉम्प्लेक्स : विविध मोबाइल कंपन्यांचे पाच टॉवर केले सील