नाशिक : महापालिकेने घरपट्टी थकविणाऱ्या ४१९ मिळकती जप्त केल्या आहेत. या सर्व मिळकतींचे मूल्यांकनाचे काम आता सुरू करण्यात आले असून, पुढील आठवड्यात लिलावप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी दिली. महापालिकेने घरपट्टी थकबाकीदारांना नोटिसा बजावून त्यांच्या मिळकती जप्त करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. आतापर्यंत ४१९ मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात अनेक बड्या थकबाकीदारांचाही समावेश आहे. सार्वजनिक वाचनालयाने सुमारे १२ लाख रुपयांची रक्कम भरत लिलावाची कारवाई टाळली. परंतु, कॉँग्रेस कमिटीने मात्र अद्यापही थकीत रकमेचा भरणा केलेला नाही. महापालिकेने सदर मिळकती जप्त करताना त्यांना २१ दिवसांत थकबाकीची रक्कम भरण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. त्यानुसार काही मिळकतधारकांनी भागश: रकमेचा भरणा केला आहे. मात्र, आता महापालिकेने जप्त केलेल्या ४१९ मिळकतींच्या मूल्यांकनाचे काम बांधकाम विभागामार्फत सुरू केले आहे. त्यानुसार, पुढील आठवड्यात प्रत्यक्ष लिलावप्रक्रियेला सुरुवात केली जाणार आहे. ज्या थकबाकीदारांनी भागश: रक्कम भरलेली आहे, त्यांनीही बजावलेल्या नोटिसीनुसार संपूर्ण रकमेचा भरणा करावा, अन्यथा त्यांच्याही मिळकतींचा लिलाव केला जाणार असल्याचे उपआयुक्त दोरकुळकर यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेने थकबाकीदारां-विरुद्ध जोरदार मोहीम राबविल्याने मार्च २०१८ अखेर सुमारे ९२ कोटी रुपये घरपट्टी वसूल झाली आहे. महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ११० कोटी रुपये थकबाकीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते.
महापालिका : ४१९ मिळकतींचे मूल्यांकन सुरू जप्त मिळकतींची पुढील आठवड्यात लिलावप्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:43 AM
नाशिक : महापालिकेने घरपट्टी थकविणाऱ्या ४१९ मिळकती जप्त केल्या आहेत. या सर्व मिळकतींचे मूल्यांकनाचे काम आता सुरू करण्यात आले.
ठळक मुद्देघरपट्टी थकबाकीदारांना नोटिसा बजावून त्यांच्या मिळकती जप्त करण्याची कारवाईकॉँग्रेस कमिटीने मात्र अद्यापही थकीत रकमेचा भरणा केलेला नाही