शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

महापालिका करणार ‘डेथ आॅडिट’ !

By संजय पाठक | Published: June 25, 2020 2:11 AM

शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७७ मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींचे झाले असले तरी त्यांना अन्य आजारदेखील होते. तथापि, मृत्यूची अचूक मीमांसा करण्यासाठी आता डेथ आॅडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देकारणमीमांसा : वृद्धांचा मृत्युदर रोखण्याचे आव्हान, दाट लोकवस्तींच्या हॉटस्पॉटवर लक्ष; तज्ज्ञांची मदत

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येपेक्षा मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आत्तापर्यंत झालेल्या ७७ मृत्यूंपैकी बहुतांश मृत्यू ज्येष्ठ आणि वयोवृद्ध व्यक्तींचे झाले असले तरी त्यांना अन्य आजारदेखील होते. तथापि, मृत्यूची अचूक मीमांसा करण्यासाठी आता डेथ आॅडिट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.शहरात कोरोनामुळे मृतांची संख्या ७७ झाली आहे. दररोज तीन ते चार कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असून, त्यात जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. तर कमी वयाच्या नागरिकांचादेखील समावेश असल्याने मृत्युदर रोखण्याचे आव्हान उभे ठाकल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. त्यामुळेच आता मृत्यूसंदर्भातदेखील आॅडिट करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.बाधितांच्या संख्येत महिलांपेक्षा पुरूषांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: २१ ते ४० वर्षे याच वयोगटात ३२९ पुरुष आणि २४४ महिलांना संसर्ग झाला आहे. या वयोगटातील पुरुष अधिक प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे हे प्रमाण अधिक आहे. तर दुसरीकडे मधुमेह, रक्तदाब यामुळे ४१ ते ६० या वयोगटातील रूणांची संख्यादेखील अधिक आहे. यातदेखील पुरुष रुग्ण अधिक आहेत.कोरोनामुक्तचे प्रमाण ४०.६७ टक्के !शहरातील कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढते आहे. ही संख्या आता तेराशेच्या वर गेली आहे. मात्र, त्याचबरोबर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्यादेखील अधिक आहे. मंगळवारी (दि.२३) प्राप्त असलेल्या आकडेवारीनुसार शहरातीत १ हजार ३७२ झाली आहे. मात्र, बरे होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. त्यात आत्तापर्यंत ५५८ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ७३८ आहे.ृमृत्युदर नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या टीमची मदतदाट लोक वस्तीतील मृतांची संख्या अधिक असून मृत्यूचे हे प्रमाण रोखण्यासाठी मुंबई येथील कोरोनाविरोधी टास्क फोर्सचे अध्यक्षडॉ. संजय ओक यांचे मार्गदर्शन महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकाºयांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. काही गरज भासल्यास त्यांच्या टास्क फोर्समधील सहकाºयांचेदेखील मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेकदा यासंदर्भात व्हिडिओनेदेखील मार्गदर्शन घेतले जात आहेत. शहरात स्वतंत्र टास्क फोर्सदेखील तयार केला जात आहे.शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठांमध्ये श्वासोच्छ्वास, मूत्रपिंड, हृदयविकार, मधुमेह अशा प्रकारचे अन्य आजारदेखील होते. मात्र, त्यानंतरदेखील सर्व प्रकारच्या मृत्यूचे आॅडिट करण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी हे आॅडिट करणार आहेत. याशिवाय शहरातील बाधितांचा मृत्युदर कमी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील दाट लोकवस्तीचे वडाळा, जुने नाशिक आणि पेठरोड- रामनगर परिसर हे कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील स्पॉट आहेत. त्या ठिकाणी मनपाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतीने प्राथमिक लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणीदेखील सुरू करण्यात आली आहे.असेही गमे यांनी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य