सिडको : महापालिकेच्या वतीने त्रिमूर्ती चौक पाठोपाठ पवननगर ते उत्तमनगर या भागातील मुख्य रस्त्यावरील दुकानदारांनी अतिक्रमण केलेले पत्र्याचे शेड, ओटे व पक्के बांधकाम काढले. मोहीम सुरू होण्याची चाहूल लागताच काही व्यावसायिकांनी स्वत:हून आपले अतिक्रमण हटविल्याचे दिसून आले. यावेळी अतिक्रमण काढताना बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी त्रिमूर्ती चौकातून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. सलग दोन दिवस त्रिमूर्ती चौकासह परिसरातील अतिक्र मण हटविण्यात आल्याने परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. यात काही ठिकाणी झालेले तुरळक वादविवाद वगळता अतिक्र मण मोहीम शांततेत झाली. त्रिमूर्ती चौक परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर झाल्याने याठिकाणचे अतिक्र मण काढणे ही अत्यंत गरजेची बाब झाली होती. मनपाने दुर्गानगर, त्रिमूर्ती चौक व दत्त मंदिर परिसरातील रस्त्यालगत असलेले अतिक्र मण काढले. यात हातगाडी, पानटपरी, कुल्फीची गाडी या जप्त करण्यात येऊन सुमारे तीस अतिक्र मणे काढण्यात आली. महापालिकेच्या वतीने आज विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या नेतृत्वाखाली पवननगर या भागातील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. यात पवननगर, राजरत्ननगर ते उत्तमनगर या भागातील दीडशेहून अधिक दुकानदारांनी केलेले अतिक्रमित पत्र्याचे शेड, ओटे तसेच जाहिरात फलक, बॅनर, दुकानाचे बोर्ड व काही ठिकाणचे पक्के बांधकाम काढण्यात आले. दोन जेसीबी, दोन अतिक्रमण पथक, दोन टॅक्टर व सुमारे पन्नासहून अधिक कर्मचाºयांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मनपा सहायक अधीक्षक अंकुश आंबेकर, मनपा बांधकाम विभागाचे अधिकारी ए. जे. काझी, अतिक्रमण सिडको विभागाचे प्रमुख जीवन ठाकरे आदींच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.
महापालिका : दिव्या अॅडलॅब परिसराचा विसर पवननगरातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:03 AM
सिडको : महापालिकेच्या वतीने त्रिमूर्ती चौक पाठोपाठ पवननगर ते उत्तमनगर या भागातील मुख्य रस्त्यावरील दुकानदारांनी अतिक्रमण केलेले पत्र्याचे शेड, ओटे व पक्के बांधकाम काढले.
ठळक मुद्दे बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी कर्मचाºयांच्या उपस्थितीत मोहीम