नाशिक : शासनाने राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर दि. २३ मार्चपासून संपूर्णत: बंदी घातल्यानंतर महापालिकेने आतापर्यंत शहरात प्लॅस्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करत ५ लाख १४ हजार रुपये दंड वसूल केला आहे. शिवाय १०४ विक्रेत्यांविरुद्ध गुन्हेही दाखल केले आहेत. दरम्यान, महापालिकेने सहा विभागात सुरू केलेल्या प्लॅस्टिक संकलन केंद्रांना शून्य प्रतिसाद मिळाला असून, विक्रेत्यांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.शासनाच्या पर्यावरण विभागाने राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकच्या वस्तू वापरण्यावर निर्बंध आणले आहेत. महाराष्टÑ विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायद्यानुसार अशा वस्तू वापरण्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. महापालिका हद्दीतील सर्व उत्पादक, विक्रेते, व्यापारी, वितरक यांनी प्लॅस्टिक पिशव्या, डिस्पोजल पॅकेंजिंग, स्ट्रॉ, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बॅग्ज, प्लॅस्टिक वेस्टन यांचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºयांना प्रथम गुन्ह्याच्या वेळी ५ हजार रुपये दंड, दुसºयांदा गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड, तर तिसºयांदा अशाच प्रकारचा गुन्हा घडल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे प्रयोजन या कायद्यात आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग धास्तावलेला आहे. विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वस्तूंचा साठा असल्यामुळे आणि पालिका तपासणी करीत असल्यामुळे व्यापाºयांना दंड भरावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून पालिकेने सहाही विभागांत प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल वस्तूंसाठी नाशिकरोड आणि पंचवटी विभागीय कार्यालयाबरोबरच नाशिक पूर्व विभागात द्वारका चौफुलीवरील गुदाम तसेच पश्चिम नाशिक विभागात कॉलेज रोडवरील कल्पनानगर येथे केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर प्लॅस्टिकच्या वस्तू जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते; परंतु गेल्या महिनाभरात पंचवटीत किरकोळ प्लॅस्टिक जमा होण्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कुठेही प्लॅस्टिक जमा झालेले नाही. महापालिकेने सुरू केलेल्या संकलन केंद्रांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, संबंधित व्यापारी आपल्याकडील प्रतिबंधित उपलब्ध प्लॅस्टिकचा साठा राज्याबाहेर विक्री करू शकतात किंवा प्राधिकृत पुनर्चक्रण करणाºया उद्योगाकडे घेऊन प्रक्रिया करू शकतात असे महापालिकेने नोटिसीत म्हटल्याने असंख्य वितरक व विक्रेत्यांनी प्लॅस्टिकच्या शिल्लक साठ्याची अन्य राज्यात विल्हेवाट लावण्याला पसंती दिली आहे, तर अजूनही शहरात ठिकठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. काही व्यापारी वर्गाकडून मात्र दंडाच्या धास्तीने प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना देणे बंद केले आहे.
महापालिका : पाच लाख रुपये दंड वसूल; १०४ गुन्हे दाखल प्लॅस्टिक संकलन केंद्रांकडे विक्रेत्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:41 AM
नाशिक : शासनाने राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर दि. २३ मार्चपासून संपूर्णत: बंदी घातल्यानंतर महापालिकेने आतापर्यंत शहरात प्लॅस्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करत ५ लाख १४ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
ठळक मुद्देप्लॅस्टिक संकलन केंद्रांना शून्य प्रतिसाद मिळाला गुन्हा घडल्यास दहा हजार रुपये दंड