नाशिक : गेल्या महिनाभरापासून महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत शहरात पावसाळापूर्व नालेसफाईचे काम जोमात सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मात्र, नालेसफाईची जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविण्यात येणार असून, रस्त्यांबरोबरच नालेसफाईचेही काम सफाई कामगारांकडून करून घेतले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबण्याची परिस्थिती उद्भवणार नसल्याचा दावा महापालिकेच्या सूत्रांनी केला आहे. दरवर्षी पावसाळापूर्व नालेसफाईची कामे हाती घेतली जातात. आजवर ही कामे पावसाळा तोंडावर असताना मे-जूनमध्ये केली जायची.यंदा स्वतंत्र प्राकलन नाहीपावसाळापूर्व कामे म्हटली की महापालिकेच्या बांधकाम विभागात पर्वणीच असायची. नालेसफाईसाठी खास स्वतंत्र प्राकलन तयार केले जायचे. अत्यावश्यक काम म्हणून कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जायची. यापूर्वी नालेसफाईतील गैरव्यवहार प्रकरणी नगरसेवकांनी बांधकाम विभागावर आरोप केले होते. मागील वर्षी शहर अभियंत्यांची चौकशीही लावण्यात आली होती. मात्र, यंदा नालेसफाईसाठी कोणतेही स्वतंत्र प्राकलन तयार करण्यात आलेले नाही अथवा त्यासाठी ठेकेदार नेमलेला नाही. उपलब्ध यंत्रणेतूनच काम करून घेतले जात आहे. त्यामुळे नालेसफाईतून ‘हातसफाई’ करणाऱ्यांची कोंडी झाली आहे.
सफाई कामगारांना नालेसफाईचेही काम महापालिका : पावसाळ्यात आरोग्य विभागाकडे जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 1:38 AM
नाशिक : गेल्या महिनाभरापासून महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत शहरात पावसाळापूर्व नालेसफाईचे काम जोमात सुरू आहे.
ठळक मुद्देरस्त्यांबरोबरच नालेसफाईचेही काम सफाई कामगारांकडून करून घेतले जाणार कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जायची