नाशिक : शहरात आणि विशेषत: शासकीय-निमशासकीय रुग्णालयांत सध्या कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या आॅक्सिजनचा प्रश्न गंभीर होत असून, त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेनेच आॅक्सिजननिर्मिती प्लांट सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्यकीय अधीक्षकांना तातडीने व्यवहार्यता पडताळण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीतदेखील याच विषयावर सदस्यांनी सूचना केल्या.शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, अनेक गंभीर रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे. मात्र सध्या खासगी आणि शासकीय-निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन मिळणे अडचणीचे ठरत आहे. स्थानिक पुरवठादारांना मुंबई आणि पुण्यावरून आॅक्सिजन आणावा लागतो. मात्र, तेथील उत्पादकांची क्षमता मर्यादित असल्याने आणि राज्यभरातून मागणी वाढल्याने त्यांनाही मर्यादा आल्या आहेत. शहरात आॅक्सिजन मिळत नसल्याने सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तथापि, जिल्हा शासकीय रुग्णालयातील अडचणी बघून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी तातडीने पुरवठादारांची बैठक घेतली आणि मोठ्या उत्पादक कंपनीकडून शंभर टन आॅक्सिजनचा कोटा वाढवून घेतला आहे. तथापि, नाशिक महापालिकेची मात्र सोय झालेली नाही. स्थानिक पुरवठादार नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात शंभर ते सव्वाशे सिलिंडर दररोज देत असले तरी त्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांना नूतन बिटको रुग्णालयाच्या जवळ अशाप्रकारे आॅक्सिजन प्लांट उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.इन्फो..स्थायी समितीचीही सूचनास्थायी समितीच्या मंगळवारी (दि.८) झालेल्या बैठकीतदेखील कोरोनासंदर्भात वादळी चर्चा झाली. त्यातदेखील आॅक्सिजन पुरवठ्याचा विषय चर्चेत आला होता. त्यावर सत्यभामा गाडेकर, प्रा. शरद मोरे यांच्यासह काही सदस्यांनीदेखील नवीन बिटको रुग्णालयाच्या जवळील जागेत प्लांट उभारण्याची सूचना केली होती. त्यामुळे त्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महापालिकाही आॅक्सिजननिर्मिती प्लांट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 1:53 AM
शहरात आणि विशेषत: शासकीय-निमशासकीय रुग्णालयांत सध्या कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या आॅक्सिजनचा प्रश्न गंभीर होत असून, त्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेनेच आॅक्सिजननिर्मिती प्लांट सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी वैद्यकीय अधीक्षकांना तातडीने व्यवहार्यता पडताळण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीतदेखील याच विषयावर सदस्यांनी सूचना केल्या.
ठळक मुद्देमहापौरांचे निर्देश : बिटकोच्या जागेची चाचपणी