सातपूर : शहरात गंभीर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेच्या वतीने साडेतीन कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्रकल्प साकारणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीत सोमवारी (दि.१९) देण्यात आली. अंबड येथे शंभर बेडचे कोविड सेंटर उभारणे, उद्योगांनी सीएसआर फंडातून व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड पुरविणे, लसीकरण केंद्र, ऑक्सिजन प्रकल्प उभारणे याविषयी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील कारखान्यांशी आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाइन चर्चा केली.जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक घेण्यात आली. उद्योगांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुमारे साडेतीन कोटी रुपये गुंतवणूक करून प्रतिदिन पाचशे सिलिंडर निर्मितीचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा विचार सुरू आहे. याच धर्तीवर सातपूर, अंबड येथील मोठ्या उद्योगांनी सीएसआर फंडामधून एकत्रितरीत्या असा ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित करता येईल काय याबाबत चर्चा करण्यात आली. अंबड येथील एमआयडीसीच्या आयटी पार्क इमारतीत किंवा अन्य पर्यायी जागेत शंभर बेडचे कोविड केअर सेंटर उभारणीसाठी औद्योगिक संघटना व उद्योजकांनी तयारी दर्शविली. कामगारांसाठी टेस्टिंग युनिट, लसीकरण केंद्राची सुविधा, ऑक्सिजन पुरवठा व निर्मितीबाबत सकारात्मक तयारी दर्शविली तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उद्योजकांनी काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.या बैठकीस एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, नाशिक महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, प्रदीप पेशकार, आयमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, निमाचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव, नाईसचे विक्रम सारडा यांच्यासह आयमा, निमा, नाईस, एमएसएमईचे पदाधिकारी, बॉश कंपनी, टीडीके, सिएट लि, ग्लॅक्सो इंडिया, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यासह अन्य उद्योगांचे अधिकारी सहभागी झाले होते.औद्योगिक क्षेत्रात दहा लसीकरण केंद्रेनाशिक जिल्ह्यात सातपूर, अंबड व सिन्नर औद्योगिक क्षेत्रात एकूण दहा टेस्टिंग सेंटर्स, लसीकरण यांचे नियोजन केले आहे. नाशिक महानगरपालिका व औद्योगिक संघटनांच्या माध्यमातून सातपूर येथील ईएसआय रुग्णालयात ५० ते शंभर बेडची कोरोनाबाधितांची व्यवस्था दोन तीन दिवसांत करण्यात येत आहे. औद्योगिक निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १२०० ऑक्सिजन सिलिंडर औद्योगिक वापरासाठी वापरणे बंद करून रुग्णालय वापरासाठी वर्ग करण्यात आले आहेत.
महापालिका आता ऑक्सिजन प्रकल्प उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 12:14 AM
सातपूर : शहरात गंभीर कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महापालिकेच्या वतीने साडेतीन कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्रकल्प साकारणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीत सोमवारी (दि.१९) देण्यात आली. अंबड येथे शंभर बेडचे कोविड सेंटर उभारणे, उद्योगांनी सीएसआर फंडातून व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड पुरविणे, लसीकरण केंद्र, ऑक्सिजन प्रकल्प उभारणे याविषयी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील कारखान्यांशी आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाइन चर्चा केली.
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची बैठक : आयटी पार्कमध्ये शंभर बेडचे कोविड सेंटर