----
एलबीटी घोळाबाबत कारवाईसाठी प्रस्ताव
नाशिक- एलबीटी संपूनही तो प्रलंबित असल्याचे दाखवून उद्योजकांना नोटिसा पाठवल्याप्रकरणी आता दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत सादर करण्यात आला आहे. १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेत त्यावर निर्णय होणार आहे. आता त्यावर महासभा काय निर्णय घेते याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
---
१७ फेब्रुवारीस मनपाचे अंदाजपत्रक सादर होणार
नाशिक- महापालिकेचे २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या १७ फेब्रुवारीस आयुक्त कैलास जाधव स्थायी समितीला सादर करणार आहेत. सध्या या अंदाजपत्रकावर हात फिरवणे सुरू आहे. ते सोमवारी अंतिम झाल्यानंतर छपाईसाठी देण्यात येईल आणि त्यानंतर ते समितीचे सभापती गणेश गिते यांना सादर केले जाणार आहे.
-----
एलईडी लाइटचा घोळ चव्हट्यावर
नाशिक- महापालिकेने वारंवार मुदतवाढ देऊनदेखील एलईडी दिवे बसवण्याचे महापालिकेचे काम पूर्ण झालेले नाही. मात्र, सुरुवातीला दंड करण्याची भाषा करणाऱ्या प्रशासनाने मौन बाळगले असून त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाेव्हेंबरअखेरीस ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास दंड करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत होते. मात्र, नंतर फेब्रुवारी महिना उलटला तरी काम पूर्ण झालेले नाही.