इंदिरानगर : महापालिकेच्या इंदिरानगर उपकार्यालयाने ७२ टक्के घरपट्टी आणि ६५ टक्के पाणीपट्टी वसुली केली आहे. तसेच थकबाकी पोटी १८ नळजोडण्या तोडण्यात आल्या आहेत.उपकार्यालयाअंतर्गत राजीवनगर, गणेशनगर, पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, कमोदनगर, जिल्हा परिषद कॉलनी, शास्त्रीनगर, राजसारथी सोसायटी, साईनाथनगर, विनयनगर, सुचितानगर, इंदिरानगर, दीपालीनगर, भारतनगर, शिवाजीवाडी या परिसराचा समावेश आहे. यामध्ये घरपट्टी मिळकतधारकांची संख्या १५७२५ आहे. त्यापैकी थकबाकीदार मिळकतधारकांना २३५६ अंतिम सूचनापत्र नोटीस बजावली आहे. तसेच २५००० रुपये थकबाकी असलेल्या २१ मिळकतींचे जप्ती आदेश काढण्यात आले आहेत.सदर मोहीम विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी रवींद्र धारणकर, जे. बी. पगारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोहीम राबवत आहे.१५ मार्चपर्यंत चार कोटी एक लाख एकवीस हजार रुपये घरपट्टी आणि पाणीपट्टी बिल मिळकतधारक संख्या ४१९२ असून, एक कोटी ४४ लाख ६२ हजार रुपये वसूल झाले आहेत. पाच हजार रुपयांवरील थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम चालू आहे.
इंदिरानगरला महापालिकेची वसुली मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:58 PM