नाशिक : जिल्ह्यात पंधरा जागांवर उभे करण्यासाठी उमेदवार नसल्याने अन्य पक्षांतील निष्ठावंतांना संधी देण्याची तयारी मनसेने केली असताना नाशिकमध्ये शिवसेनेचा नगरसेवक त्यांच्या गळाला लागला आहे. रविवारी (दि. २९) शिवसेनेचा राजीनामा देणारे सिडकोतील नगरसेवक दिलीप दातीर यांनी सोमवारी (दि. ३०) मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला.२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. त्यानंतर या पक्षाला गेल्या निवडणुकीत भोपळा-देखील फोडता आला नव्हता. दरम्यान, यंदा निवडणुकीत हो-नाही म्हणता मनसेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी उमेदवारीबाबत अडचण होती. नाशिकमध्ये आढावा घेण्यासाठी आलेले मनसे नेता अभिजित पानसे आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागा लढविण्याची घोषणा केली होती. मात्र सर्व जागांवर उमेदवार मिळणार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले होते. त्याची सुरुवात झाली असून, शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेत प्रवेश केला आहे.
सेनेचा नगरसेवक मनसेच्या गळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:14 AM