८ सप्टेंबरला आलेल्या महापुरात गांधी चौक, आंबेडकर चौक व फुले चौक, बाजार रस्ता या ठिकाणी पुराचे पाणी घुसून व्यापारीवर्गाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. लेंडी नदीपात्रात असलेली कच्ची, पक्की बांधकामे असून यामुळे पुराचे पाणी अडून ते शहरात घुसले याला सर्वस्वी नगरपरिषद कारणीभूत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
‘आम्ही सर्व नगरपरिषदेचे कर व अधिभार नियमित भरत असतो. आमच्या मालमत्तेचे रक्षण करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. केवळ नदीपात्रातील व लगतची अतिक्रमणे याकडे दुर्लक्ष केल्याने आमचे अतोनात नुकसान झाले. आमची कोणती ही चूक नसताना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले’ असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
रेल्वेचा सब वे चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यातील तांत्रिक दोष, सब वेचा यू टर्न काढून सब वेची दुरुस्ती व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदनावर दिलीप पारख, नरेंद्र शर्मा, विलास रासकर, राजकुमार सोमाणी, नितीन चांडक, दिनेश शेठी, जुगलकिशोर अग्रवाल आदी प्रमुख व्यापाऱ्यांसह इतरांच्या सह्या आहेत.
फोटो - १७ नांदगाव फ्लड
पूर ओसरल्यानंतर रस्त्यावर साचलेला चिखल हटविण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली.
170921\17nsk_24_17092021_13.jpg
फोटो - १७ नांदगाव फ्लड