नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती तसेच प्रशासकीय कामकाज तसेच किराणा सहज मिळावा आणि नागरिकांना जीवनावश्यक सुविधा सहज मिळाव्या यासाठी नाशिक महापालिकेने तीन अॅप विकिसत केले आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या पुढाकाराने हे तीन अॅप तयार करण्यात आले आहेत.यात करोनाबाधितांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी ठटउ उडश्कऊ-19 , संशयित कोरोना रु ग्णांच्या ट्रेकिंग साठी महाकवच तर नागरिकांना किराणा आणि अन्य साहित्य घरपोच मिळावे यासाठी नाशिक बाजार हे तीन मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहेत.कोरोनाच्या विरोधात सध्या शासन, प्रशासन आणि समाज निर्णायक लढाई करीत आहेत. प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्ष लढाई करीत असल्या तरी नाशिक मनपाने कोरोनाच्या विरोधात डिजिटल लढाई सुरू केली आहे.यातील ठटउ उडश्कऊ-19 हे नागरिकांच्या प्रबोधनासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. या अॅपवर शहरातील हॉस्पीटल्स,डॉक्टरांच्या माहितीसह अत्यावश्यक सेवांबाबतची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.सोबतच या मोबाईल अॅप्लिकेशन मध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची किंवा करोना रु ग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची बाबत माहिती नागरिक भरू शकणारआहेत.नागरिकांच्या फिडबॅकनंतर ही माहिती पालिकेच्या डॅशबोर्डवर झळकणार असून त्यासाठी पालिकेला तात्काळ उपाययोजना करता येणार आहे. या शिवाय कोरोना संशयित आणि प्रत्यक्ष रु ग्णांवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाच्या सोयीचे महाकवच हे अॅप तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून कोरनटाईन कॉन्टॅक्ट, ट्रेकिंग यासह अन्य माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे यात जिओ फेन्सींग आणि सेल्फी अटेंडनसची सोय करण्यात आल्याने प्रशासकीय कामकाज अत्यंत चोख पणे होण्यास मदत होणार आहे.महाकवच अॅपद्वारे मिळणार माहितीप्रशासनासाठी असलेल्या महाकवच अॅपच्या माध्यमातून प्रशासनाला काम करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे प्रशासनाला कॉन्टॅक ट्रेसिंग आण िदुसरे म्हणजे क्वारंटाइन ट्रॅकिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचं ट्रेसिंग. करता येणार आहे. महाकवच अॅप इनस्टॉल केलं जाईल तेव्हा अशा व्यक्तींचं क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिओ फेन्सिंग व सेल्फी अटेंडन्स . अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा अॅपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजणे शक्य होणार आहे.असे डाऊनलोड करता येईल अॅपनागरिकांशी संबंधित मोबाईल अॅप्लिकेशन मनपाच्या ँ३३स्र://६६६.ल्लेू. ॅङ्म५. ्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.नाशिक बाजार अॅपखास नागरिकांच्या सोयीसाठी नाशिक बाजार हे अॅप तयार करण्यात आले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सद्या गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पोलिसांनी संचारबंदी केल्यानंतरही किराणा आणि अन्य अत्यावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात जात आहेत त्यावर पर्याय म्हणून हे अॅप तयार करण्यात आले आहेत. त्यात नागरिक आणि दुकानदार यांना माहिती नोंदवता येईल.आणि आपल्या परिसरातील दुकानदाराकडून घरपोच किराणा मागवता येईल.
कोरोनाविरोधात मनपाची डिजिटल लढाई तीन अॅप तयार : आयुक्त गमे यांची संकल्पना, प्रबोधनाबरोबरच प्रशासकीय सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:59 AM