नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह आणि परिसराच्या स्वच्छतेच्या ठेक्यापोटी एका मक्तेदार संस्थेकडून करून घेण्यात आलेल्या कामाचे ५६ लाख रुपये अदा करण्याच्या प्रस्तावाचा घोळ अजूनही मिटलेला नाही. येत्या शुक्रवारी (दि. २०) होणाऱ्या महासभेत तब्बल सहाव्यांदा हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. महापालिकेची ऑनलाइन महासभा येत्या शुक्रवारी होणार आहे. त्यात हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. गेल्या महासभेत यावरून बरीच चर्चा झाली असली तरी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने हा प्रस्ताव तहकूब करण्यात आला होता. याशिवाय महासभेत सातपूर विभागात विविध ठिकाणी बेंचेस बसवणे आणि म्हसरूळ येथे गणेशनगर भागात उद्यान विकसित करणे या कामाचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.
महापालिकेची शुक्रवारी महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:18 AM