झाकीर हुसेन हे मुळातच गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी परिचित आहे. कोराेनाकाळात तर सर्वांनाच आधार ठरले होते. दुर्घटना घडल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू होत असल्याने यासंदर्भात देखील शंका आणि चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर अवघ्या काही तासांतच राज्य शासनाने चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या चौकशी समितीपाठोपाठ महापालिकेच्या वतीनेदेखील चौकशी करण्याबाबत ठरवण्यात येईल, असे स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी सांगितले होते. त्यानंतर झालेल्या समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली आणि अवघ्या २१ दिवसांत टाकी कशी नादुरुस्त झाली यावर चर्चा करताना संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशदेखील प्रशासनाला देण्यात आले. तसेच महापालिकेचे अधिकारी तसेच नगरसेवक यांची चौकशी समितीदेखील नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, चौकशी समिती गठित झालीच नाही की गुन्हा देखील दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे समितीने चर्चा करून काय साधले, असा प्रश्न निर्माण झाला.
महापालिकेची चौकशी कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:16 AM