इंदिरानगर : मेनरोडवरील मनपाच्या पूर्व विभागाच्या कार्यालयाची पडझड झाल्याने स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहे, या लोकमत वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी (दि.३०) पंडित कॉलनीतील कार्यालय मनपा शिक्षण मंडळाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे.मेनरोड येथील महापालिकेची विभागीय कार्यालय आणि गैरसोयीचे ठरत आहे, गेल्या महिन्यात झालेल्या तर पावसाने येथील महापालिकेच्या पुरातन इमारतीचा काही भाग ढासळला होता. सुदैवाने कोणती मोठी दुर्घटना घडली नाही इमारती कामकाज स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र अजूनही जुन्या इमारतीत कामकाज सुरू आहे. या लोकमत वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयात स्थलांतरित करण्यास सुरु वात होणार आहे. विभागीय कार्यालय सुमारे पाचशे कर्मचारी काम करतात तसेच दररोज शेकडोंच्या संख्येने नागरिक ये-जा करीत असतात धोकेदायक इमारती प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहते काय? असा प्रश्न निर्माण झाला होता .विभागीय कार्यालय नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने गैरसोयीचे ठरत आहे वाहनतळाची अपुरी व्यवस्था असल्याने कर्मचारी व नागरिकांची गैरसोयीचे ठरत होते. त्यामुळे नागरिक मेनरोड रस्त्यावर वाहने लावत होते तसेच गेल्या दोन्ही प्रभागसभेत सदस्यांनी प्रशासनाला विभागीय कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यामुळे अखेर प्रशासनात जाग येऊन येथील विभागीय कार्यालय स्थलांतरित सुरु वात करण्यात आले.स्मार्ट सिटीअंतर्गत इमारतीचे नूतनीकरणस्मार्ट सिटीच्या टीमने मेनरोड येथील पुरातन धोकेदायक इमारतीची पाहणी केली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सदर इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
मेनरोडवरील मनपा कार्यालयाचे आज होणार स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:20 AM