नाशिक : ‘स्मार्ट रोड’च्या पुढील टप्प्यातील कामाला त्र्यंबक नाक्यापासून सुरुवात करण्यात आल्याने रविवारपासून वाहतूक पोलीस व महापालिकेने त्र्यंबक नाका ते थेट अशोकस्तंभापर्यंत एकेरी वाहतुकीचा मार्ग घोषित केला. यानुसार सोमवारी (दि.२६) पोलिसांकडून अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी पर्यायी मार्गावर वाहतुकीचे तीनतेरा वाजले आणि महापालिका व पोलीस प्रशासनाचे ‘स्मार्ट नियोजन’ फ सले. नाशिककर सकाळपासून दुपारपर्यंत वाहनांच्या गराड्यात अडकल्याचे चित्र पहावयास मिळाले. स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा समावेश झाल्यानंतर रस्ते स्मार्ट क रण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत आहे; मात्र त्यासाठी करण्यात आलेले नियोजन अशास्त्रीय पद्धतीचे असल्यामुळे नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवसभर रस्त्यांवर कोंडी झाली होती.पर्यायी मार्गावर वाहतुकीचा बोजवाराअशोकस्तंभापासून त्र्यंबक नाक्यापर्यंत जाणारी वाहतूक गंगापूररोडने पंडित कॉलनी, कॅनडा कॉर्नरमार्गे तसेच रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नलवरून शालिमारमार्गे वळविण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन पर्यायी रस्ते ‘जॅम’ झाले होते. एम.जी.रोडवरून आलेली वाहतूक स्तंभाकडे न जाता थेट गोळे कॉलनीमधून गंगापूररोडवर येत असल्याने गोळे कॉलनीमधील अरुंद रस्त्यांवर कोंडी निर्माण झाली. तसेच रविवार कारंजावरून शालिमारकडे जाणारी वाहतूक रेडक्रॉस सिग्नलवर विस्कळीत झाल्यामुळे काही वाहने घनकर गल्लीतून स्तंभावर जाण्याच्या प्रयत्नात असल्याने घनकर गल्ली-अशोकस्तंभ रस्त्यावरही वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.मेहेर चौक ते सीबीएसपर्यंतच्या रस्त्याचे विकासाचे काम मागील तीन ते चार महिन्यांपासून सुरू आहे. आता त्यापुढील टप्प्यात सीबीएस ते त्र्यंबक नाका आणि मेहेर ते अशोकस्तंभपर्यंतच्या रस्ता विकासकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. अशोकस्तंभाकडून त्र्यंबक नाक्याकडे जाण्यास वाहनांना मज्जाव करण्यात आला. तसेच मेहेर ते सीबीएस सिग्नलपर्यंतही आता वाहनचालकांना जाता येणार नाही.
महापालिका , पोलीस प्रशासनाचे ‘स्मार्ट नियोजन’ फ सले.; नाशिककरांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 1:17 AM