शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

स्मार्टरोडच्या सदोष कामांमुळे महापालिका हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 1:06 AM

स्मार्टरोडच्या कामांमुळे नागरिक तर त्रस्त आहेच, परंतु महापालिकेला सुद्धा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकनाक्यावरून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला कुशन न लावताच ती तशीच ठेवण्यात आली आहे,

नाशिक : स्मार्टरोडच्या कामांमुळे नागरिक तर त्रस्त आहेच, परंतु महापालिकेला सुद्धा अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्र्यंबकनाक्यावरून अशोकस्तंभाकडे जाणाऱ्या जलवाहिनीला कुशन न लावताच ती तशीच ठेवण्यात आली आहे, तर मलवाहिका टाकताना कमी अधिक व्यासाच्या जोडण्यात आल्या आहेत. याशिवाय मुख्य जलवाहिनी (रायझिंग) नळजोडण्या देण्याचा प्रकार घडत असून, या स्मार्ट कारभारामुळे महापालिकेचे अधिकारीही थक्क झाले आहेत.महापालिकेच्या जलवाहिनीला कुशन्स न टाकता वाकडी टाकण्यात आल्याने कोणत्याही प्रकारचे अवजड वाहन या स्मार्ट रोडवरून गेल्यास जलवाहिनी फुटू शकते असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे असून संबंधित अधिकारी यासंदर्भात कंपनीला पत्र देणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कंपनीने मात्र सारवासारवा केली असून, सर्व कामे नकाशा आणि निकषानुसारच होत असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकाद्धारे केला आहे. स्मार्टरोडचे वादग्रस्त काम अद्याप पूर्ण झालेले नसून आता ३१ आॅगस्टचा मुहूर्त देण्यात आला आहे. त्यामुळे कंपनी घाईगर्दीत कामे करीत असल्याचा आरोप कंपनीच्या संचालकांनीच केला आहे. स्मार्ट सिटीच्या रस्त्याविषयी सुरुवातीपासूनच ओरड सुरू आहे. महपाालिकेचे अधिकारी उघडरीत्या काही बोलू शकत नसले तरी दर्जा विषयी साऱ्यांचीच ओरड आहे.हेमलता पाटील यांचे आक्षेपस्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराविषयी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी आक्षेप घेतला असून, त्यात दर्जा आणि गुणवत्तेविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. कामाचा दर्जा योग्य नसून या रस्त्यावरून गेल्यानंतर कोस्टर राइडचा आनंद मिळतो स्मार्ट हा शब्द केवळ नावालाच असून, नियम निकषानुसार कामे होत नसल्याचा आरोप पाटील यांनी केलाआहे. अनेक प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले असून, त्याला अनुसरून कंपनीने सारवासारव करणारा खुलासा केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी