शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

भानामतीसाठी चौथीच्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 2:12 PM

मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

मुरबाड - मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे भानामतीसाठी या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. सुरज भोईर असे हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे विद्यार्थी व पालक वर्गात सर्वत्र खळबळ माजली आहे. सुरज भोईर लघवीसाटी बाहेर गेला होता, मात्र तो शाळेत परतलाच नाही. त्याचा शोध घेतला असता शाळेशेजारील ओसाड घरात सुरज रक्ताच्या थरोळ्यात पडलेला आढळला. शाळेतील विद्यार्थ्यांने ही बाब शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिले असता शिक्षकांनी सुरजला  उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो बेशुद्ध अवस्थेत असल्यानं शिक्षकांनी पालकांना बोलावून घेतले. यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

पोलीस निरिक्षक अजय वसावे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून मारेकऱ्यांचा शोधदेखील सुरू करण्यात आला आहे. शासनाने शिक्षण क्षेत्रात आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शाळा डिजिटल करण्याची मोहीम हाती घेतली आसली तरी त्या शाळामधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता यावर मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना आखली नसल्याने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.

ही घटना भयावह असून यामागे गावातीलच एका व्यक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्याची हत्या भानामतीसाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत मारेक-याला अटक करत नाही तोपर्यंत सुरजचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थी