मालेगाव मध्य : शहरातील म्हाळदे शिवारातील गुलशन ए मदीनाबाद येथे बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सततच्या भांडणाला कंटाळून सराईत गुन्हेगार राजू बांगडू याचा शालकाने दोन गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. याप्रकरणी मयताचा भाऊ राशिद मोहंमद सलीम (२६) रा. कमालपुरा याने दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन संशयितास अवघ्या दोन तासात पोलिसांनी ताब्यात घेतले.शाहिद अहमद मोहम्मद सलीम ऊर्फ राजू बांगडू (४०) रा. हाफिज शेर अली चौक, कमालपुरा याचे त्याच्या दुसरी पत्नी सोबत पटत नसल्याने ती माळधे शिवारातील गट नं. ४१ गुलशन ए मदीनाबाद येथे माहेरी राहत होती. दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी दोघांमध्ये फारकतही झाली होती. त्यांना सात आठ महिन्याचा मुलगा आहे. त्यामुळे मुलास भेटण्यासाठी राजू बांगडू कायम येऊन पत्नीशी भांडण करायचा. त्यास सासू-सासरे व शालक कायम विरोध करीत होते. दोन महिन्यांपूर्वी राजूने सासऱ्याची रिक्षाही पेटवली होती.याबाबत पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास राजूने नेहमीप्रमाणे पत्नीशी भांडण करण्यास सुरुवात केली. त्याचाराग आल्याने अल्पवयीन शालकाने प्रथम राजूच्या डोळ्यात मिरची पूड टाकून बंदुकीच्या दोन गोळ्या डोक्यात झाडल्या. राजू जमिनीवर कोसळताच धारदार शस्त्राने गळा चिरून त्याने पळ काढला. लॉकडाउनमध्ये शहरात खून झाल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणीकरून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.राजूच्या सासरच्या मंडळींनी घरास कुलूप ठोकून पळ काढला होता. मात्र दोन तासातच संशयिताने हत्यारांसह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करीत आहे.शाहिद अहमद मोहम्मद सलीम ऊर्फ राजू बांगडू हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर शहरातील पोलीस ठाण्यात एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्याची घटनास्थळ भागात एवढी दहशत होती की, त्याच्या हत्येनंतरही गल्लीतील रहिवाशांनी घराचे दरवाजाचे नव्हे तर घराबाहेरील विजेचे दिवेही बंद करून ठेवले होती. स्वत: अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आजूबाजूच्या रहिवाशांकडून कुणाचे घर आहे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु शेजारच्या महिलेने आम्हास माहीत नाही म्हणत दरवाजा बंद केला. इतरांनी तर दरवाजा उघडण्याचे धाडस केले नाही. यापूर्वी राजू बांगडूवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती.
सराईत गुन्हेगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:08 PM
म्हाळदे शिवारातील गुलशन ए मदीनाबाद येथे बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सततच्या भांडणाला कंटाळून सराईत गुन्हेगार राजू बांगडू याचा शालकाने दोन गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. याप्रकरणी मयताचा भाऊ राशिद मोहंमद सलीम (२६) रा. कमालपुरा याने दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन संशयितास अवघ्या दोन तासात पोलिसांनी ताब्यात घेतले.
ठळक मुद्देम्हाळदे शिवारातील घटना : संशयित दोन तासात ताब्यात