पिंपळगाव बसवंत : शहरातील अंबिका-नगर परिसरात घराजवळ बसण्यावरून दोन गटात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा गुरु वारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयितांवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंबिकानगर परिसरात गणपती विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (दि.१) दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घराजवळ बसण्याच्या किरकोळ कारणावरून शिंदे व धाडीवाल या दोन गटात वाद झाला. त्यातील धाडीवाल गटाकडून शिंदे कुटुंबातील दोघा बाप-लेकांवर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात पुंडलिक गंगाराम शिंदे (६७) व माणिक पुंडलिक शिंदे (४०, रा. अंबिकानगर) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी (दि.३) उपचार सुरू असताना बाप-लेकांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसांनी विकी दत्तात्रय धाडीवाल (२७) व अजय प्रकाश धाडीवाल (१९, रा. अंबिकानगर, पिंपळगाव बसवंत) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. तपास निरीक्षक संजय महाजन उपनिरीक्षक सैंदाणे हे करीत आहेत.परिसरात जवान तैनातगणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या हल्ल्यातील बाप-लेकाचा गुरु वारी (दि.३) मृत्यू झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या भागात राज्य राखील पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे.
पिंपळगावी पिता-पुत्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 1:31 AM
पिंपळगाव बसवंत शहरातील अंबिका-नगर परिसरात घराजवळ बसण्यावरून दोन गटात झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा गुरु वारी (दि. ३) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयितांवर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्देदोघांना अटक : घराजवळ बसण्याचा वाद