शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

शाळकरी मुलाचा गळा आवळून निघृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 2:00 PM

प्रवाशी विजय अनिल आव्हाड (२६,केपानगर, सिन्नर) याने आक्षेप घेत त्यांना इकडे कोणत्या रस्त्याने जात आहे? असे विचारले असता त्यांनी कार एका ऊसशेतीच्या मळे परिसरात उभी करुन विजय यास मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल, चार हजाराची रोकड हिसकावून घेत त्याच्या हातावर चाकूने वार केला.

ठळक मुद्देजबरी लूटीचा प्रत्यक्षदर्शी असल्याने हत्या झाल्याचा संशयदोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : येथील सामनगावरोडवरील एका नऊ वर्षीय मुलाचा निघृणपणे खून करुन त्याचा मृतदेह सिन्नर तालुक्यातील एका नदीकाठावर फेकून अज्ञात मारेकऱ्यांनी पोबारा केल्याची घटना बुधवारी (दि.२) उघडकीस आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी तपासाला गती देत मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी हलविला आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गाडेकर मळा येथील रामजी लालबाबू यादव (वय९) या मुलाला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या एका युवकाने भाजीपाला आणण्याच्या बनाव करुन सोबत घेत नाशिकरोडला ओम्नी कारमधून नेले. नाशिकरोड येथे त्या युवकाचा दुसरा साथीदार कारमध्ये बसला आणि त्यांनी रामजीला खाऊचे प्रलोभन दाखवून कारमध्ये बसवून ठेवले.

यावेळी सिन्नरफाटा येथे सिन्नर जाणाऱ्या एका प्रवाशालाही त्यांनी कारमध्ये बसविले. यानंतर ओम्नी त्यांनी महामार्गाने सिन्नरच्यादिशेने नेण्याऐवजी सामनगाव-एकलहरा रस्त्याने नेली. यानंतर हल्लेखोरांपैकी रामजीच्या घराशेजारी राहणारा युवक रात्री घरी आला असता मुलाच्या आईवडिलांनी त्याला त्यांचा मुलगा कोठे आहे? असे विचारले असता त्याने "मी तुमचा फोन आला तेव्हाच त्याला सायंकाळी घराजवळ आणून सोडले होते" असे सांगितले. घाबरलेल्या आईवडिलांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यानंतर पोलिसांनी तत्काळ सिन्नर पोलिसांनाही मुलाचा शोध घेण्याबाबत कळविले आणि दोघा संशयितांचा शोध घेत ताब्यात घेतले आहे.? त्यांची कसून चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.?----जबरी लूटीचा गुन्हा लपविण्यासाठी मुलाचा आवळला गळाप्रवाशी विजय अनिल आव्हाड (२६,केपानगर, सिन्नर) याने आक्षेप घेत त्यांना इकडे कोणत्या रस्त्याने जात आहे? असे विचारले असता त्यांनी कार एका ऊसशेतीच्या मळे परिसरात उभी करुन विजय यास मारहाण करत चाकूचा धाक दाखवून त्याचा मोबाइल, चार हजाराची रोकड हिसकावून घेत त्याच्या हातावर चाकूने वार केला. यावेळी पाठीमागून दुसरे वाहन आल्याने य हल्लेखोरांपनी विजय यास तेथेच सोडून मुलाला घेऊन ओम्नीतून पळ काढला. हा सगळा प्रकार नऊ वर्षीय रामजीसमोर घडल्यामुळे संशयित हल्लेखोरांनी या गुन्ह्याची वाच्यता होऊ नये म्हणून मुलाचाही गळा आवळून खून करत त्याचा मृतदेह सिन्नर पोलिसांच्या हद्दीतील डुबेरे गावाच्या शिवारात एका नदीकाठालगत फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखूनCrime Newsगुन्हेगारी