‘जवाब दो’ आंदोलन : दाभोलकरांच्या मारेकºयांच्या अटकेची मागणीनाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे. त्यांना अटक कधी? असा प्रश्न पुरोगामी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढत उपस्थित करण्यात आला. दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष उलटली आहेत व पानसरे यांच्या खुनालाही जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत असून, अद्याप या दोन्ही गुन्ह्यांमधील संशयित सारंग अकोलकर व विनय पवार यांना अटक करण्यात आलेली नाही. ही अटक कधी होणार? असा प्रश्न मूक मोर्चाद्वारे उपस्थित करत शनिवारी (दि.१९) पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘दाभोलकर आपके कातिल अभी जिंदा हैं...’ यासह सरकारी यंत्रणांचा निषेध नोंदविणारे फलक झळकविले. राज्यस्तरीय आंदोलनअंनिसच्या वतीने येत्या रविवारी (दि.२०) दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यस्तरावर ‘जवाब दो..जवाब दो’ आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मूक मोर्चा काढला गेला. या दरम्यान, रविवारी राज्यस्तरावर संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने मारेकºयांची भित्तीपत्रके झळकविली जाणार आहेत. शासनाला जाब विचारण्यासाठी राज्यस्तरावर हे आंदोलन हाती घेण्यात आल्याची माहिती राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.
कातिल अभी जिंदा हैं...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 1:05 AM