शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मोरूस्करांच्या आरोपाचे खंडन : बससेवेला समर्थन कधीही केले नाही; विरोधी गटाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 6:40 PM

‘कन्व्हर्जन’ सदरात ६१३.४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे व तो खर्च केंद्र किंवा राज्य शासनाच्या अखत्यारितीतील मंडळांच्या निधीतून होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर कुठलेही आर्थिक संकट येणारे नाही. तसेच यापुर्वी केंद्र सरकारकडे पाठविलेल्या स्मार्टसिटीच्या प्रस्तावामध्ये राज्य परिवहन महामंडळ व महापालिका यांची संयुक्त कंपनी स्थापन करुन शहर बससेवेचा गाडा चालवावा, असे सूचित करण्यात आले होते.

ठळक मुद्दे स्मार्टसिटीच्या प्रस्तावाला आम्ही उपसूचना देऊन विविध विधायक सूचना केल्यात्या प्रस्तावात कोठेही परिवहन सेवेचा उल्लेख नव्हता,बससेवा ‘कन्व्हर्जन’मध्ये

नाशिक : महापालिकेच्या गेल्या महासभेत बुधवारी (दि.१९) भाजपाचे गटनेते नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी शहर बससेवा महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव दिल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर केला होता; त्यांचा हा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शाहू खैरे, सलीम शेख यांनी पत्रकार परिषदेत फेटाळला. स्मार्टसिटीच्या प्रस्तावाला आम्ही उपसूचना देऊन विविध विधायक सूचना केल्या होत्या, त्या प्रस्तावात कोठेही परिवहन सेवेचा उल्लेख नव्हता, असे स्पष्ट केले.बुधवारच्या महासभेत रात्री उशिरा शहर बससेवा महापालिकेने चालविण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मोरूस्कर यांनी एका कागदाच्या आधारे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची कोंडी करण्याच्या हेतूने बससेवेला यापुर्वी पाठिंंबा दिला व तसा प्रस्तावही महासभेत पुढे आणला होता, असा आरोप केला; मात्र त्यांना प्रस्तावाच्या अभ्यासाचा विसर पडल्याचे बोरस्ते म्हणाले. आम्ही स्मार्टसिटीच्या प्रस्तावाला त्यावेळी उपसुचना केली. त्यामध्येअध्यक्ष आयुक्त असावेत, स्मार्टसिटी कंपनीने मनपाच्या मंजुरीशिवाय कर्ज काढू नये, मालमत्ता गहाण ठेवण्याचा अधिकार कं पनीला नसेल, टीपी अंतर्गत मिळणाऱ्या जमिनी मनपाच्या मालकीच्या असतील अशा विधायक सूचनाही केल्या होत्या. त्या प्रस्तावात कोठेही परिवहन सेवेचा उल्लेख नव्हता, आम्ही प्रस्तावासाल संमती दिली; मात्र गुरूमित बग्गा यांनी स्मार्टसिटीच्या प्रस्तावाला त्यावेळीही विरोध दर्शविला होता, असे बोरस्ते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्मार्टसिटीचा मूळ प्रस्ताव २१९४.६३ कोटी रुपयांचा असून त्यामध्ये स्मार्टसिटीचे ९७८ कोटींचा खर्चाचा आराखडा आहे.बससेवा ‘कन्व्हर्जन’मध्ये‘कन्व्हर्जन’ सदरात ६१३.४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे व तो खर्च केंद्र किंवा राज्य शासनाच्या अखत्यारितीतील मंडळांच्या निधीतून होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर कुठलेही आर्थिक संकट येणारे नाही. तसेच यापुर्वी केंद्र सरकारकडे पाठविलेल्या स्मार्टसिटीच्या प्रस्तावामध्ये राज्य परिवहन महामंडळ व महापालिका यांची संयुक्त कंपनी स्थापन करुन शहर बससेवेचा गाडा चालवावा, असे सूचित करण्यात आले होते. या प्रस्तावास रा.प.मंडळाने १५५ कोटी रुपये कंपनीला द्यावेत तसेच सर्व बसेस, बसस्थानक, मनपाकडे बससेवेसंबंधी असलेल्या सर्व जागा कंपनीला हस्तांतरीत कराव्यात असे नमुद करण्यात आले होते. या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार मंडळाकडून सुरू असल्याचे पत्रही महापालिके च्या तत्कालीन आयुक्तांना प्राप्त झाले होते, असे बग्गा यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी