नाशिक : ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’च्या वतीने होणाऱ्या ‘वेणुनाद’ कार्यक्रमाचा संगीत संदेश शहरात घरोघरी पोहोचवण्यासाठी युवक-युवतींची खास पथके तयार करण्यात आली आहेत. तरुणाईसाठी ध्यान, योग, सुदर्शन क्रिया, एकाग्रता व आत्मविश्वास वाढ याबाबत ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’च्या वतीने शहरात शिबिरे घेतली जातात. या शिबिरांत चिराग पाटील, राहुल पाटील, सूरश्री रानडे, सुलक्षण कुयटे, रुधिरा बागुल, दिग्विजय खरोटे, सचिन म्हसणे, विशाल चव्हाण, प्रसाद पिंपळे विशाल व्हिजन, स्मृती ठाकूर, मयुरी मालपुरे, स्वाती बारपांडे आदि यात प्रशिक्षण देतात. आगामी ‘वेणुनाद’च्या पार्श्वभूमीवर या शिबिरांशी संलग्न युवकांची पथके तयार करण्यात आली आहेत. हे तरु ण शहरातील घरोघरात ‘वेणुनाद’चे निमंत्रण पोहोचणार आहेत. अधिकाधिक लोकांना आमंत्रित करण्याचा संकल्प करण्याचे नियोजन करण्यात आले.
‘वेणुनाद’ कार्यक्रमाचा संगीत संदेश
By admin | Published: January 05, 2015 1:37 AM