सायखेडा : श्री विठ्ठल संगीत मंच, सायखेडा द्वारे यावर्षी संगीत भजन रजनी या सांगितिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते . परिसरातील शेकडो संगीत प्रेमी रसिक श्रोत्यांनी कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शविली. या सुश्राव्य मैफिलीचा मनमुराद आनंद लुटला. पंडित रमाकांत गायकवाड व त्यांचे पिताश्री भजनसम्राट सूर्यकांत गायकवाड या पिता-पुत्रांनी सांप्रदायिक नियमाप्रमाणे जय जय रामकृष्णहरी ते जय जय विठ्ठल रखुमाई भजन (पंचपती) सुरेल सादर करून सर्व रिसक श्रोत्यांना भक्ती रसाने मंत्रमुग्ध केले. विविध संतांच्या भक्ती रचना वेगवेगळ्या रागांमधून मांडत भिक्तभाव स्पष्ट करत या पिता-पुत्रांनी रिसकांची मने जिंकली.तसेच गायत्री, बागेश्री आणि संगीता गायकवाड यांनीही काही गवळणी आण िगझल सादर केल्या. मैफिलीच्या उत्तरार्धात ठुमरी, भैरवी आण ितबलानवाज श्री पांडुरंगजी पवार यांच्या तबला सोलो ने रसिक मंत्रमुग्ध झाले.मैफिलीला पखवाज साथ मनोजभांडवलकर तसेच तालध्वनी किरनजी गोसावी यांनी दिली. सूत्रसंचालनाची झालर भूषण मटकरी यांनी लावली.
सायखेड्यात रंगली संगीत भजन रजनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 5:46 PM