नाशिक : ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’, ‘मेरी आवाज ही पहचान है‘’,‘सख्या रे’ यांसारख्या हिंदी व मराठी चित्रपटांतील अजरामर गीतांनी सजलेल्या ‘रजनीगंधा’ संगीत मैफलीने अतिशय उत्साही आणि प्रसन्न वातावरणात वसंत व्याख्यानमालेचा संगीतमय समारोप झाला.शहरातील सांस्कृतिक विश्वाची ओळख असलेल्या वसंत व्याख्यानमालेचा शुक्रवारी (दि. ३१) समारोप झाला. गेल्या महिना भरापासून गोदाघाटावरील यशवंत महाराज देवमामलेदार पटांगणावर सुरु असलेल्या वसंत व्याख्यानमालेचे एकतिसावे तथा अखेरचे पुष्प क्षितिज प्रस्तृत ‘रजनीगंधा’ कार्यक्रमाने गुंफण्यात आले. व्याख्यानमालेचे माजी अध्यक्ष गो. ह. देशपांडे, प्रा. टी. ए. कुलकर्णी, अॅड. पु. रा. बुरकुले, विमादी पटवर्धन, द. रा. दीक्षित यांना हे पुष्प समर्पित करण्यात आले. कार्यक्रमात वृक्षवल्ली आम्हां सोयरी याअभंगाने संगीत मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर सुन्या सुन्या मैफलीत माझ्या.. या चिमण्यानो परत फिरारे, येऊ कशी प्रिया... चांदण्यात फिरताना अदी गाजलेली गीते विद्या कुलकर्र्णी यांनी सादर केली. तसेच मेरी अवाजही पहचान हैं... कांटोसे खिचके ये आचल, मेघा छाये आधीरात आदी गाणी उषा पाटेकर यांनी सादर केली. यावेळी प्रसिद्ध उद्योजक अशोक कटारिया यांनी पुकरता चला हूं में, अजसे पहले..जिंदगी कैसी हैं पहेली आदी गीते सादर करून रसिकांची दाद मिळविली. त्याचप्रमाणे गिटारवादक जयंत पाटेकर यांनी साद केलेल्या जीना यहाँ, मरना यहाँ या गीताने मैफलीचा समारोप झाला. या मैफलीला अमित ओक (संवादिनी), अनिल धुमाळ (सिंथेसायझर), अमोल पाळेकर (ढोलक), आदित्य कुलकर्णी (तबला), शुभम जाधव (अॅक्टोपॅड) यांनी साथसंगत केली, तर धनेश जोशी, प्रीती जैन यांनी निवेदन केले.
संगीतमय मैफलीने व्याख्यानमालेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 12:36 AM