वनसगांव : निफाड तालुक्यातील चाटोरी गावाला पुराच्या पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पूरग्रस्तांना निफाड तालुका मुस्लिम कमिटीने मदतीचा हात देत माणुसकी हाच धर्म असा संदेश दिला.चाटोरी गावात पाणी घुसल्याने अनेकांचे संसार वाहून गेले. मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन लोक उघड्यावर आले. या ग्रामस्थांना निफाड तालुका मुस्लिम कमिटीने मदतीचा हात दिला. पूर आल्यानंतर चाटोरी गाव विस्थापित झाले होते. काही विस्थापितांचा अन्न आणि पाण्यासाठी संघर्ष सुरू होता. अशा परिस्थितीत येथील निफाड मुस्लिम तालुका कमिटीचे पदाधिकारी इरफान भाई सय्यद, शकील भाई, अब्दुलभाई शेख, वसीम पठाण, शमूभाई, नौशादभाई यांनी पिण्याचे पाणी व चारशे ते साडेचारशे पूरग्रस्तांचे अन्नपदार्थ घेत चाटोरी गाव गाठले. या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला.
मुस्लिम कमेटीकडून पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 4:01 PM
मदतीचा हात देत माणुसकी हाच धर्म असा संदेश
ठळक मुद्दे काही विस्थापितांचा अन्न आणि पाण्यासाठी संघर्ष सुरू होता