नाशिक : गोवर आजारामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी येत्या २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, सुमारे १९ लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात येणार आहे. पल्स पोलिओचा डोस बालकांना देण्यास नकार देणाऱ्या मालेगावच्या मुस्लीम समाजानेही या आजाराचे गांभीर्य ओळखून इंजेक्शनद्वारे देण्यात येणाºया गोवर लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली.जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासातून गोवर आजाराने होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी गोबर व रुबेला लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून सलग पाच आठवडे ही मोहीम सुरू राहणार असून, जिल्ह्यात १९ लाख २३ हजार ९७० बालकांना ही लस दिली जाईल. त्यात नाशिक महापालिका क्षेत्रात ४ लाख ९० हजार २८८, मालेगाव महापालिका क्षेत्रात १ लाख ९३ हजार २२२ तसेच नाशिक ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात ११ लाख ४० हजार ४८८ बालकांचा समावेश आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील ५५०४ ग्रामीण शाळा, ३३२० बाह्य संपर्क सत्र, २१९ जोखीमग्रस्त भाग, ३८८० संस्थेतील लसीकरण सत्र अशा एकूण १२,९२३ ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.यासाठी ८६५ आरोग्य सेविका, ३५१६ आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कार्यकर्तींची मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात शाळांपासून करण्यात येणार असून, प्रथम सर्व शाळांतील मुलांना ही लस टोचली जाणार आहे. एकही मूल यापासून वंचित राहू नये यासाठी टास्कफोर्सची निर्मिती करण्यात आली असून, जिल्हाधिकारी त्याचे प्रमुख असतील.मालेगावमधून होता विरोधमालेगाव शहरातील मुस्लीम समाजाकडून धार्मिकतेचे कारण देत शासनाच्या लसीकरण मोहिमेला केल्या जात असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मालेगावी मदरसा व धार्मिक संस्थांच्या प्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांनाही या लसीकरणाची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लस घेण्यास कोणताही विरोध नसल्याचे सांगितल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
मुस्लीम समाज गोवर, रुबेला लस घेण्यासाठी राजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:38 PM
गोवर आजारामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी येत्या २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, सुमारे १९ लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात येणार आहे. पल्स पोलिओचा डोस बालकांना देण्यास नकार देणाऱ्या मालेगावच्या मुस्लीम समाजानेही या आजाराचे गांभीर्य ओळखून इंजेक्शनद्वारे देण्यात येणाºया गोवर लसीकरणास सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली.
ठळक मुद्दे२७ नोव्हेंबरपासून मोहीम : टास्क फोर्सची निर्मिती